social media esakal
ग्लोबल

Social Media वरील निगेटीव्ह पोस्टचे विपरीत परिणाम; तरुणीने संपवलं जीवन

सकाळ डिजिटल टीम

लंडन - सोशल मीडियावरील निगेटीव्ह पोस्टच्या प्रभावामुळे एका १४ वर्षीय तरुणाची जीव गेल्याचं समोर आलं आहे. तरुणीने निगेटीव्ह पोस्टच्या वाईट परिणामांमुळे आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. ही घटना ब्रिटनमधील आहे. (bad impact of social media content news in Marathi)

पोस्टमार्टम रिपोर्ट देणाऱ्या तज्ज्ञाने या संदर्भात खुलासा केला आहे. युवतीच्या आत्महत्येमुळे सोशल मीडिया जेवढा चांगला तेवढाच घातकही असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

नॉर्थ लंडनमधील कोर्टात असं सांगण्यात आलं की मयत मॉली रसेल इंटरनेटवरील नकारात्मक कंटेन्टच्या प्रभावाखाली आली होती. ज्यामुळे तिच्यावर नकारात्मक परिणाम झाला. तसेच तिला तिला नैराश्य आले होते, त्यानंतर ती आणखी एका गंभीर आजाराच्या विळख्यात सापडली होती. तसेच तिने डिप्रेशनबाबत गरजेपेक्षा अधिक डेटा सर्च करून स्वत:ला नुकसान पोहोचवल्याचही सांगण्यात आलं आहे.

रसेलने मृत्यूच्या 6 महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर सुमारे 16 हजार 300 पोस्ट सेव्ह, शेअर किंवा लाईक केल्या होत्या. यापैकी 2,100 पोस्ट नैराश्य, स्वत:चे नुकसान किंवा आत्महत्येशी संबंधित होत्या. रसेलचा 2017 मध्ये हॅरो (लंडन) येथे मृत्यू झाला होता, त्यानंतर तिच्या कुटुंबाने सोशल मीडियाच्या धोक्यांबद्दल मोहीम सुरू केली होती.

रसेलचे वडील म्हणाले, "जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने आपली जहरी कार्यसंस्कृती बदलण्याची वेळ आली आहे. शिवाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुमच्या मुलांच्या हातात निगेटीव्ह कंटेन्ट देत असताना तुम्ही मुलांना ते हाताळण्याची परवानगी का देता, असा सवाल ही त्यांनी पालकांना केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आजचा भाव किती? जाणून घ्या CNGचे दरही

अरुणा इराणी यांच्यावर दु:खाचा डोंगर; पती कुकू कोहली यांचं 77व्या वर्षी निधन

Kolhapur Konkan New Road: कोल्हापुरातून कोकणात जाण्यासाठी आणखी एक घाटमार्ग, घोटगे-सोनवडे मार्गासाठी केंद्राची मंजुरी; कुडाळ-कोल्हापूर अंतर होणार कमी

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

SCROLL FOR NEXT