Ukraine appeal to the world Weapons should be provided Five killed in Luhansk Kuleba shared his video on Twitter
Ukraine appeal to the world Weapons should be provided Five killed in Luhansk Kuleba shared his video on Twitter sakal
ग्लोबल

युक्रेनचे जगाला आवाहन; लुहान्स्कमध्ये पाच जण मृत्युमुखी

सकाळ वृत्तसेवा

किव्ह : ‘पाश्‍चिमात्य देशांनी आम्हाला मोठी शस्त्रास्त्रे पुरवावीत, त्याशिवाय आम्ही रशियाला मागे ढकलू शकत नाहीत, आमची काळजी वाटत असेल तर शस्त्र पुरवा,’ अशी कळकळीची विनंती युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दीमित्रो कुलेबा यांनी केली आहे. कुलेबा यांनी ट्विटरवर आपला व्हिडिओ प्रसिद्ध करत मदतीचे आवाहन केले आहे. कुलेबा म्हणाले की,‘‘युक्रेन आणि रशियाच्या सैनिकांची युद्धक्षमता सारखीच आहे. फक्त मोठ्या शस्त्रांच्या संख्येत रशिया आमच्यापेक्षा खूप वरचढ आहे. रणगाडे, लढाऊ विमाने, रॉकेट लाँचर यांच्याशिवाय आम्ही रशियाचा मुकाबला करून त्यांना माघारी ढकलू शकत नाहीत.

रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनच्या पूर्व भागातील स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे जगाला जर युक्रेनची खरोखर काळजी असेल तर आम्हाला शस्त्रे द्या.’’ युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनीही काल (ता. २६) अमेरिका आणि युरोपकडे शस्त्रांची मागणी केली होती. आम्हाला शक्य तितक्या लवकर आणि अधिक प्रमाणात रॉकेट लाँचर द्या, जेणेकरून पूर्व भागात आम्ही रशियाचा सामना करू शकू, असे झेलेन्स्की यांनी आवाहन केले होते. युक्रेनच्या पूर्वेकडील लुहान्स्क भागात रशियाने आज जोरदार बाँबवर्षाव केला. या हल्ल्यात किमान पाच नागरिकांचा मृत्यू झाला.

युद्धाच्या आघाडीवर

  • अन्नधान्याच्या टंचाईला पाश्‍चिमात्य देश कारणीभूत : रशिया

  • सिव्हीरोदोनेत्स्क शहर पूर्वेकडील युद्धाच्या केंद्रस्थानी

  • या शहरात आतापर्यंत १५०० जणांचा मृत्यू झाल्याचा दावा

  • रशियाच्या आणखी दोन सैनिकांवर युद्धगुन्ह्यांचा आरोप

  • फिनलंडच्या पंतप्रधान साना मरीन यांचा युक्रेन दौरा

  • युक्रेनमधील रशियाच्या ताब्यातील भागांमध्ये रशियन टीव्हीचे प्रक्षेपण सुरु

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT