Russia-Ukraine War eSakal
ग्लोबल

Moscow Drone Attack : युक्रेनचा थेट रशियाच्या राजधानीवर हल्ला! विमानतळ केलं बंद; थरारक व्हिडिओ समोर

Russia-Ukraine War : या हल्ल्यामुळे आता हे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Sudesh

गेल्या दीड वर्षांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. यातच आज पहाटे युक्रेनने थेट रशियाच्या राजधानीवरच हल्ला केला. मॉस्कोमध्ये ड्रोनच्या सहाय्याने दोन इमारतींवर हल्ला करण्यात आला. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

मॉस्कोचे मेयर सर्जे सोबयानिन यांनी या हल्ल्याची पुष्टी केली आहे. अर्थात, यामध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सोबतच, या इमारतींना जास्त नुकसान झालं नसल्याचंही ते म्हणाले. सोशल मीडियावर या हल्ल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. (Ukraine Drone Attack)

या इमारती रशिया सरकारच्या शासकीय इमारती असल्याचं म्हटलं जात आहे. यातील आयक्यू क्वार्टर नावाच्या इमारतीमध्ये सरकारी कर्मचारी राहतात. या हल्ल्यामध्ये एक व्यक्ती जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. (Ukraine Attack)

सैन्याने पाडले ड्रोन

या हल्ल्यानंतर खबरदारी म्हणून नुकावो विमानतळ बंद करण्यात आलं आहे. तसंच, रशियाच्या सैन्याने मॉस्कोच्या पश्चिम भागात युक्रेनचं आणखी एक ड्रोन नष्ट केल्याचंही सांगण्यात येत आहे.

रशियाला कोरियाची साथ?

दरम्यान, अमेरिकेने उत्तर कोरियावर रशियाला मदत करत असल्याचे आरोप केले आहेत. नॉर्थ कोरिया समुद्रमार्गे रशियाला मोठ्या प्रमाणात मिसाईल आणि इतर शस्त्रं पुरवत असल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi convoy: मोदींच्या ताफ्यात फक्त २ गाड्या! इंधन बचतीसाठी PM मोदींची मोठी कृती; व्हिडिओ देशभर व्हायरल

केडीएमसीमध्ये शिंदेसेना-मनसेची जवळीक! श्रीकांत शिंदे आणि राजू पाटलांची यांची भेट; पडद्यामागे काय घडलं?

Latest Marathi News Live Update : धुळ्यात शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत सव्वाशे क्विंटल पीक जळून खाक

Pune Crime : कौटुंबिक वादातून सुनेकडून सासूचा खून; सुनेला अटक

CBSE HSC Exam Result : 'सीबीएसई'चा बारावीचा निकाल ३.१९ टक्क्यांनी घसरला

SCROLL FOR NEXT