Ukraine first hearing on war crimes Against Russian soldier sakal
ग्लोबल

युक्रेनचा निर्णय; युद्धगुन्ह्याबाबत पहिली सुनावणी लवकरच

दहा हजारांहून गुन्ह्यांचा तपास करणार

सकाळ वृत्तसेवा

किव्ह : युक्रेनमध्ये रशियाच्या एका सैनिकाविरोधात युद्धगुन्हेगारीबाबतचा पहिला खटला लवकरच सुनावणीसाठी घेतला जाणार असल्याचे युक्रेनतर्फे आज जाहीर करण्यात आले. युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिण भागात रशियाचे जोरदार हल्ले सुरु असून हा भाग विलीन करुन घेण्याच्या रशियाच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर हा खटला सुरु होणार आहे.

रशियाच्या सार्जंट व्हादिन शिशीमरीन (वय २१) याच्याविरोधात खटला चालविला जाणार आहे. फेब्रुवारीमध्ये सायकलवरून जाणाऱ्या एका सामान्य नागरिकाला व्हादिन याने गोळ्या घालून ठार मारल्याचा आरोप आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. युक्रेनमध्ये १० हजार ७०० युद्धगुन्ह्यांबाबत तपास सुरु असून सहाशेहून अधिक रशियन सैनिकांवर आरोप आहेत. दरम्यान, रशियाच्या ताब्यात गेलेले खेरसन हे शहर रशियाचा हिस्सा म्हणून घोषित करावे, अशी मागणी येथील एका नेत्याने केली आहे. अनेक नागरिकांनी मात्र यास विरोध केला आहे.

फिनलंडला हवे ‘नाटो’चे सदस्यत्व

हेलसिंकी : युक्रेनने ‘नाटो’ संघटनेचे सदस्यत्व घेऊ नये, हे रशियाच्या आक्रमणामागील एक कारण असताना फिनलंडचे अध्यक्ष आणि पंतप्रधानांनी आज ‘नाटो’चे सदस्यत्व स्वीकारण्याची तयारी दर्शविली. स्वीडनही येत्या काही दिवसांत या संघटनेत दाखल होण्याचा अंदाज आहे. फिनलंड हा रशियाचा शेजारी देश असून या दोघांमध्ये १३४० किलोमीटर लांबीची सीमा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT