Ukraine must win the war against Russia Emmanuel Macron sakal
ग्लोबल

रशियाविरोधातील युद्धात युक्रेनचा विजय आवश्‍यक - इमॅन्युएल मॅक्रॉन

फ्रान्ससह चार देशांच्या प्रमुखांचा किव्ह दौरा

सकाळ वृत्तसेवा

किव्ह : ‘रशियाविरोधातील युद्धात युक्रेनचा विजय होणे आवश्‍यक आहे. आम्ही युक्रेनच्या नागरिकांच्या पाठिमागे ठाम आहोत,’ असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज सांगितले. मॅक्रॉन यांच्यासह आज जर्मनी, रोमानिया आणि इटलीच्या प्रमुखांनी युक्रेनचा दौरा केला. यावेळी त्यांनी युद्धात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. युक्रेनी अधिकाऱ्यांनी त्यांना रशियाने केलेल्या हल्ल्यांची आणि अत्याचारांची माहिती दिली. यानंतर पत्रकारांशी बोलताना मॅक्रॉन म्हणाले की,‘‘आम्ही पहिल्या दिवसापासून युक्रेनच्या पाठिशी आहोत. रशियाने येथील ऐतिहासिक शहरांमध्ये अनन्वित अत्याचार केले आहेत.’’ मॅक्रॉन यांनी केलेले आरोप रशियाने फेटाळले आहेत.

युद्धात युक्रेनला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन, जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ शोल्झ, इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी आणि रोमानियाचे अध्यक्ष क्लॉस योहानिस यांनी किव्हला भेट दिली.

युद्धाच्या आघाडीवर

  • ब्रिटनचे रशियावर नवे निर्बंध जारी

  • नाटो देशांनी पाठविलेला शस्त्रसाठा क्षेपणास्त्रांनी उडवून लावल्याचा रशियाचा दावा

  • पाश्‍चात्य देशांनी युक्रेनला शस्त्र पुरवठा करण्यावरच लक्ष केंद्रीत करू नये : रशिया

  • रशियाने इशारा देऊनही अमेरिका आणि जर्मनी युक्रेनला शस्त्रे पाठविणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT