ukraine russia war Accept terms destruction Vladimir Putin sakal
ग्लोबल

अटी मान्य करा, अन्यथा विनाश करू : पुतीन

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा पाचवा महिना सुरु असताना, ‘कारवाईची ही तर फक्त सुरुवात आहे,’ असे रशियाने म्हटले आहे

सकाळ वृत्तसेवा

मॉस्को : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा पाचवा महिना सुरु असताना, ‘कारवाईची ही तर फक्त सुरुवात आहे,’ असे रशियाने म्हटले आहे. तसेच, युक्रेनने आमच्या अटी तातडीने मान्य कराव्या, अन्यथा आणखी विनाशासाठी सज्ज राहावे, असा इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी दिला आहे. युक्रेनमधील रशियासमर्थक नेत्यांशी संवाद साधताना पुतीन यांनी पाश्‍चिमात्य देशांवर टीका केली. ते म्हणाले,‘‘अखेरचा युक्रेनी नागरिक जिवंत असेपर्यंत आम्ही युद्ध करत रहावे, अशीच पाश्‍चिमात्यांची इच्छा आहे.

युक्रेनसाठी ही अत्यंत खेदाची बाब असली तरी वाटचाल त्याच दिशेने सुरु आहे. आमच्याविरोधात मोठ्या मोठ्या वल्गना करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की आम्ही अजूनही पूर्ण जोर लावून कारवाई सुरुच केलेली नाही. त्यामुळे युक्रेनने आमच्या अटी तातडीने मान्य कराव्या. नाहीतर, आतापर्यंत झाला त्याहून कितीतरी अधिक मोठ्या विनाशासाठी सज्ज रहावे.’’ युद्ध थांबविण्यासाठी आम्ही चर्चा करण्यास आहोत. चर्चेसाठी तुम्ही जितका विलंब कराल, तितका तुम्हालाच त्रास अधिक होईल, असेही पुतीन यांनी झेलेन्स्की यांना बजावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT