America Force Indian To Speak Against Russia e sakal
ग्लोबल

मोदींवरील दबाव वाढतोय! रशियाविरोधात बोलण्यासाठी अमेरिकेचा आग्रह

सकाळ डिजिटल टीम

सध्या युक्रेन रशिया युद्ध (Ukraine Russia War) सुरूच आहे. आतापर्यंत युद्धासंबंधित झालेल्या बैठकांमध्ये भारताने तटस्थ भूमिका घेतली आहे. पण, आता युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाविरोधात बोलण्यासाठी भारतावर (India) अमेरिकेचा दबाव वाढत आहे. भारतीय अमेरिकी खासदार रो खन्ना यांच्या नेतृत्वात अमेरिकेतील (America) खासदारांनी भारताचे अमेरिकेतील राजदूत तरनजीत सिंह संधू यांच्यासोबत फोनवरून याबाबत चर्चा केली.

सध्या रशियाने युक्रेनवरील आक्रमण आणखी तीव्र केलं आहे. यामध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याविरोधात भारताने आवाज उठवावा, असं राजदूतांना सांगितल्याचं खन्ना यांनी सांगितलं. तसेच भारत रशियाचा चांगला मित्र असल्यानं हे युद्ध थांबविण्याची विनंती देखील केली.

रशियाविरोधात बोलण्यासाठी अमेरिकेने दबाव टाकल्याची ही दोन दिवसांतील दुसरी घटना आहे. एक दिवसापूर्वी टेड डब्ल्यू लियू आणि टॉम मालिनोवस्की या दोन नेत्यांनी देखील भारताने रशियाविरोधात भूमिका घ्यावी, असा आग्रह धरला होता. आम्ही भारताचे रशियासोबत असलेले संबंध समजू शकतो. पण, संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत भारताच्या तटस्थ भूमिकेमुळे आम्ही नाराज आहोत, असं त्यांनी म्हटलं होतं. पण, भारत अद्यापही तटस्थ भूमिकेवर कायम आहे.

युक्रेनवरील हल्ल्याचा निषेध म्हणून पाश्चात्य देशांना रशियावर निर्बंध लादले आहेत. रशियाच्या कच्च्या तेलाच्या आयातीला बंदी घातली आहे. रशियाचे नुकसान होत असल्यानं व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवरील आक्रमण अधिकच तीव्र केलं आहे. रशियन सैन्याने गुरुवारी खारकिव्हजवळील मेरेफा शहरात शाळा आणि सांस्कृतिक केंद्रावर हल्ला केला. यामध्ये तब्बल २१ जणांचा मृत्यू झाला, तर २५ जण जखमी झाले. यापूर्वी शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला असून हजारो नागरिकांनी देश सोडून इतर पाश्चिमात्य देशाकडे धाव घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT