Ukraine Russia War Effect Condom Sales Increase Russia e sakal
ग्लोबल

Ukraine Russia War चा परिणाम, रशियात कंडोमच्या विक्रीत १७० टक्क्यांनी वाढ

सकाळ डिजिटल टीम

सध्या युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध (Ukraine Russia War) सुरू आहे. या युद्धाचा निषेध करण्यासाठी पाश्चात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रशियात महागाई वाढत आहे. तसेच काही वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. या भीतीने नागरिक वस्तूंचा साठवणूक करत आहेत. त्यामुळे रशियात कंडोमच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून मार्च महिन्यात १७० टक्क्यांनी कंडोमची विक्री वाढल्याचे दिसून आले. (Condom Sales Increase In Russia)

देशातील सर्वात मोठ्या ऑनलाइन विक्रेत्या Wildberries ने गेल्या वर्षीच्या तुलनेत मार्च महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत कंडोमची विक्री १७० टक्के वाढल्याचे म्हटले आहे. तसेच रशियातील प्रमुख फार्मसी चेन ३६.६ ने विक्रीत २६ टक्के वाढ नोंदवली आहे. तसेच सुपरमार्केटने तब्बल ३० टक्के वाढ नोंदवली आहे, असा अहवाल आरबीसीने दिला आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी निषेध नोंदवला. तसेच रशियावर निर्बंध लादले (Western Sanctions on Russia) आहेत. रशियन तेलावर देखील निर्बंध लादले असून तेलाची आयात बंद केली आहे. त्याचा परिणाम रशियाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. पाश्चात्य निर्बंधांमुळे रशियन रुबलचे मूल्य कमी झाले आहे. अर्थव्यवस्था कोलमडेल या भीतीने आउटलेट्सला महागाई वाढविण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे कंडोमच्या किंमती वाढल्या आहेत. ब्रँडनुसार कंडोमच्या किंमती ५० टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. तरीही लोक भविष्यात तुटवडा निर्माण होईल या भीतीने कंडोमची खरेदी करत आहेत, असे प्रिझर्वेटिव्हनाया सेक्स शॉपच्या मालक येसनिया शमोनिना यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाणी समजून टरपेंटाईन पिलं, दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; नागपूरमधील घटना

Gadchiroli News: उघड्यावर असलेले धान उचलणार कधी?; दुर्लक्षामुळे धान्याची नासाडी; दोन लाख ३८ हजार ५४९ क्विंटल धानाची उचल नाहीच

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

Global Economy: युद्धामुळे इंधन, खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार; IMF आणि जागतिक बँकेचा इशारा!

IPL, CSK vs KKR: अजिंक्य रहाणे दुहेरी कात्रीत सापडला; आधी कोलकाताने मॅच हरली, नंतर BCCI ने कारवाई केली; नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT