France on Ukraine Russia War  Sakal
ग्लोबल

Ukraine Russia War : NATO कडेही अण्वस्त्र आहेत, फ्रान्सचा पुतिन यांना इशारा

सकाळ डिजिटल टीम

रशियानं युक्रेनवर हल्ला (Ukraine Russia War) केला आहे. त्यामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. हे युद्ध दोन देशांच्या पलीकडे जाऊ नये, यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. पण, अणुयुद्धाचा धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ''रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russia President Vladimir Putin) अणु हल्ल्याची धमकी देतात. पण, NATO मधील देशांकडे देखील अण्वस्त्र आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावं'', असं फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री म्हणाले.

तुम्ही इतिहासात कधीही इतके भंयकर परिणाम बघितले नसतील असं पुतिन म्हणाले होते. त्यांचं हे वक्तव्य अणुहल्ला करण्याबाबत होतं का? असा प्रश्न फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्र्यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले, पुतिन यांना अणुहल्ल्याबाबतच सुचित करायचं होतं. नेटोमध्ये जितके देश आहेत त्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत हे पुतिन यांनी लक्षात ठेवावं, असं ते रायटर्ससोबत बोलताना म्हणाले.

रशिया आणि युक्रेनमधील वादाचं रुपांतर युद्धात झालं असून रशियानं युक्रेनचे ७० लष्करी तळ उद्धवस्त केले आहेत. तसेच युद्धाच्या पहिल्याच दिवशी अत्यंत विदारक चित्र समोर आले असून तब्बल १३७ जणांचा मृत्यू झाला. तसेच युक्रेनचे १०० सैनिक मारल्याचा दावा रशियानं केला आहे. डॉनबॉसमधून सुरू झालेलं युद्ध आता राजधानी कीव्हपर्यंत पोहोचलं असून आज कीव्हमध्ये देखील स्फोट झाले आहेत. इतकंच नाहीतर रशियाच्या सैनिकांनी अणूभट्टीचा देखील ताबा घेतला आहे. त्यामुळे आता हा परिसर सुरक्षित नसल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, युक्रेनमध्ये २० हजार भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना आहे तिथेच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आम्हाला लवकरात लवकर मायदेशी परत न्यावं, अशी विनंती विद्यार्थ्यांनी केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १२०० विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT