Cyber War on Russia E sakal
ग्लोबल

Ukraine Russia वादात हॅकर्सची उडी, रशियाविरोधात पुकारलं सायबर युद्ध

सकाळ डिजिटल टीम

युक्रेन-रशियामध्ये युद्ध (Ukraine Russia War) सुरू आहे. दुसऱ्याच दिवशी या युद्धाचे भयंकर परिणाम दिसू लागले आहेत. रशियानं युक्रेनवर हवाई हल्ला केला असून यामध्ये १३७ जणांचा मृत्यू झाला आहे. पण, आता या दोन देशांच्या युद्धामध्ये एका हॅकर्स ग्रुपने उडी घेतली आहे. या हॅकर्सने रशियाविरोधात सायबर युद्ध (Cyber War on Russia) सुरू केले आहे.

रशियावर सायबर हल्ला करणार असल्याची घोषणा काल 'Anonymous' नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी सायबर हल्ला केला असून रशियाच्या सर्व शासकीय वेसबाईट, वृत्त वाहिन्या आणि महत्वाच्या वेबसाईट बंद पाडल्याचा दावा हॅकर्सने केला आहे. यामध्ये संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटचा देखील समावेश आहे. याशिवाय हॅकर्सने इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या सर्व्हरवर देखील सायबर हल्ला केला असून अनेक ठिकाणचे इंटरनेट ठप्प झाले आहे.

युक्रेन-रशिया युद्धाचे भयंकर परिणाम दिसत आहेत. रशियानं युक्रेनची राजधानी कीव्हवर देखील बॉम्बहल्ला केला आहे. तसेच कीव्हवर हवाई हल्ल्याची देखील भीती आहे. रशियाच्या सैनिकांनी खेळी करत युक्रेनच्या सैनिकांचा गणवेश घातला आणि युक्रेनच्या लष्कराचे वाहन जप्त केले. त्याच वाहनाने हे सैनिक कीव्हला पोहोचल्याची माहिती युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानं केली आहे. तसेच युक्रेनमध्ये सध्या अत्यंत वाईट परिस्थिती असून युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी इतर देशांना मदतची याचना केली आहे. औषध आणि राजकीय मदत पुरवण्याची विनंती युक्रेनच्या खासदारांनी भारताला केली आहे.

दरम्यान, अमेरिकेने रशियावर कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला असून G7 देशांनी त्याला परवानगी दिल्याचं म्हटलं आहे. रशियाला सोडणार नसल्याचं जो बायडन यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT