India on Ukraine Russia War  e sakal
ग्लोबल

Ukraine Russia War : आम्ही अस्वस्थ! स्वतंत्र चौकशी करा, UN मध्ये भारताची भूमिका

सकाळ डिजिटल टीम

युक्रेनच्या बुचा येथील नागरिकांच्या हत्येचा अहवाल अस्वस्थ करणारा असल्याचे भारताने (India on Ukraine Russia War) संयुक्त राष्ट्राच्या (UN) बैठकीत म्हटले आहे. याची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे. भारताची युक्रेन-रशिया युद्धावर आतापर्यंतचं सर्वात कठोर वक्तव्य आहे. आम्ही या हत्यांचा स्पष्ट निषेध करतो, असं भारताचे राजदूत टीएस तिरुमूर्ती म्हणाले.

रशियाच्या ताब्यातील बुचा शहरात मारल्या गेलेल्या नागरिकांच्या कबरी आणि मृतदेहांवर जगभरात संताप व्यक्त होत असून रशियाविरुद्ध अधिक कठोर निर्बंध लादले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालयात गुन्हेगारी कारवाईची मागणी होत आहे. युक्रेन आणि पाश्चात्य देशांनी रशियन सैनिकांवर युद्धात गुन्हा केल्याचा आरोप केला आहे. बुचा येथे एकाच वेळी अनेक नागरिकांचे मृतदेह सापडले असून ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका आणि नाटो या देशांनी बुचा येथील या भितीदायक चित्रांबाबत आवाज उठवला. एवढेच नाही तर काहींना गोळ्या झाडण्यापूर्वी हात-पाय बांधलेले दिसले.

सोमवारी, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला बुचा येथील नागरिकांच्या सामूहिक हत्येबद्दल सांगितले की, रशियाची वृत्ती दहशतवाद्यांपेक्षा वेगळी नाही. बुचा शहर रशियन सैन्याच्या ताब्यातून मुक्त झाल्यानंतर तेथे सामूहिक कबरी सापडल्याचे त्यांनी सांगितले. लोकांचे मृतदेह सापडले आहेत. किमान 300 नागरिक मारले गेले आहेत. बोरोदका आणि इतर शहरांमध्येही जीवितहानी वाढू शकते, असं झेलेन्स्की म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

रेसलिंग विश्वावर शोककळा! सामना खेळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ४० वर्षांच्या WWE स्टार PAC चे निधन

Pune Cleanliness Drive: पुण्यात अस्वच्छता करणाऱ्यांकडून ८ महिन्यांत १.८७ कोटींचा दंड; दंडवाढीचा प्रस्ताव तयार

Latest Marathi News Live Update: ठेकेदाराला सहा लाखाचा दंड

Asian Games: नीरज नव्हता, पण तरी यशवीर-रोहितने भालाफेकीत जिंकली मेडल्स; गुलवीरलाही ऐतिहासिक रौप्य

SCROLL FOR NEXT