Volodymyr Zelensky
Volodymyr Zelensky सकाळ डिजिटल टिम
ग्लोबल

Russia-Ukraine : "युद्ध थांबवण्याचा एकच मार्ग, पुतीन यांच्याशी चर्चा करु"

सकाळ डिजिटल टीम

मागील काही दिवसांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामुध्ये अनेक भारतीय विद्यार्थी व नागरिक युक्रेनमध्ये अडकलेले आहेत. तसेच रशियाने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यूही झाला. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी बुधवारी रात्री रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (vladimir putin) यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. जाणून घेऊयात आज गुरुवारचे अपडेट्स ...

बेलारुसमध्ये चर्चेच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे. यापूर्वी झालेली चर्चेची पहिली फेरी ही निष्फळ ठरली होती. मात्र आता या चर्चेतून नेमकं काय साध्य होतं? युद्ध थांबणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाच्या मुस्क्या आवळण्याचे प्रयत्न जगभरातून केला जातोय. त्यानंतर आता वर्ल्ड कप २०२२ च्या विरोधात रशियाने कोर्ट ऑफ आर्बीट्रेशन फॉर स्पोर्ट्स मध्ये धाव घेतली आहे.

  • खार्किवमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी भारतीय दूतावासाने त्यांच्या ट्वीटरवरून एक फॉर्म जारी केला आहे. हा फॉर्म त्वरित भरण्यास सांगण्यात आले आहे.

  • रशिया आणि युक्रेनमधील युद्धावर तोडगा काढण्यासाठी युक्रेनियाचे शिष्टमंडळ रशियासोबत चर्चेसाठी बेलारूसमध्ये दाखल झाले आहे.

  • आमची पहिली अॅडव्हायझरी जारी झाल्यापासून एकूण 18,000 भारतीय नागरिक युक्रेनमधून भारतात परतले आहेत. ऑपरेशन गंगा अंतर्गत, युक्रेनमधून 6,400 भारतीयांना घेऊन आतापर्यंत 30 उड्डाणे भारतात पोहोचली आहेत. पुढील 24 तासांत आणखी 18 फ्लाइटचे वेळापत्रक आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे.

  • अणुयुद्धाचा कोणताही विचार नसल्याचे रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी म्हटले आहे.

  • रशियन आणि बेलारूस खेळाडूंना विंटर पॅरालिम्पिकमध्ये बंदी घालण्यात आली आहे. : आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती (IPC)

  • जर्मनी युक्रेनला आणखी 2,700 अँटी-एअर मिसाईल्स देणार आहे: एएफपी न्यूज एजन्सी

  • 'ऑपरेशन गंगा'अंतर्गत 3726 भारतीयांना आज भारतात आणण्यात येईल. बुखारेस्ट येथून 8 फ्लाइट, सुसेवा येथून 2 फ्लाइट, कोसीस येथून 1 फ्लाइट, बुडापेस्ट येथून 5 फ्लाइट आणि रझेझोव येथून 3 फ्लाइटने मायदेशी आणण्यात येईल. : केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे

  • केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि वीरेंद्र कुमार यांनी युक्रेनमधून बुडापेस्ट (हंगेरी) मार्गे परतलेल्या भारतीयांचे स्वागत केले.

  • अमेरिकेने बुधवारी असा आरोप केलाय की, रशियाने माध्यमस्वातंत्र्याविरोधात आणि सत्याविरोधातच युद्ध पुकारलं आहे. कारण रशियाने स्वतंत्र वृत्तवाहिन्यांचे वार्तांकन रोखलं असून रशियानांना युक्रेनवरील हल्ल्याबाबतच्या खऱ्या बातम्यांबाबत समजू दिलं जात नाहीये.

  • किव्हमध्ये दोन मोठे स्फोट

  • रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून आतापर्यंत 7,000 हून अधिक रशियन सैनिक मारले गेले आहेत. तर वरिष्ठ अधिकार्‍यांसह शेकडो लोकांना कैद करण्यात आले आहे, असे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या लष्करी सल्लागाराने बुधवारी सांगितलंय. रशियन सैन्याच्या कमांडरला गंभीर जखमी झाल्यानंतर बेलारूसला नेण्यात आलंय, असंही सल्लागार ओलेक्सी अरेस्टोविच यांनी एका टेलिव्हिजन ब्रीफिंगमध्ये सांगितलंय.

  • युक्रेनमधील २०८ भारतीय नागरिकांना घेऊन जाणारे भारतीय हवाई दलाचे तिसरे C-17 विमान पोलंडमधील रझेझो येथून दिल्लीजवळील हिंडन एअरबेसवर उतरले. त्याठिकाणी संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी भारतीय नागरिकांच्या आगमनानंतर त्यांच्याशी संवाद साधला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT