One More Indian Student Died Ukraine Russia War sakal
ग्लोबल

युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, उपचारावेळी गेला जीव

सकाळ डिजिटल टीम

सलग सातव्या दिवशीही युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध (Ukraine Russia War) सुरूच आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याचा मंगळवारी मृत्यू झाला होता. त्यानंतर आता दुसऱ्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. विन्नित्सिया शहरातील मेमोरियल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारा चंदन जिंदल हा विद्यार्थी आजारी पडला होता. उपचारावेळी त्याचा जीव गेल्याची माहिती आहे. (One More Indian Student Died Ukraine)

चंदन जिंदाल (२२) हा पंजाबमधील रहिवासी असून तो युक्रेनमधील विन्नित्सिया शहरातील मेमोरियल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होता. जिंदालला मेंदूत इस्केमिक स्ट्रोक (मेंदूला रक्त पुरवठा कमी होणे) आल्याने त्याला याच शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह परत आणण्यासाठी त्याच्या वडिलांनी भारत सरकारला पत्र लिहिले आहे. याबाबत हिंदूस्थान टाईम्सने वृत्त दिले आहे.

मंगळवारी एका विद्यार्थ्याचा मृत्यू -

रशियन सैनिकांनी युक्रेनमधील खारकीव्ह शहरात गोळीबार केला होता. यामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मंगळवारी मृत्यू झाला आहे. नवीन शेखरप्पा असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो कर्नाटकातील रहिवासी आहे. त्याचा मृतदेह परत आणण्यासाठी कुटुंबीयांनी सरकारला विनंती केली असून सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या पंजाबी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

रशियानं अचानक युक्रेनवर हल्ला केल्यानं परिस्थिती अनियंत्रित झाली. त्यामुळे २० भारतीय विद्यार्थी युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकून पडले होते. आतापर्यंत १२ हजार भारतीयांनी मायदेशी परत आणल्याची माहिती आहे. अद्यापही ८ हजार भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहे. विशेष म्हणजे, रशिया-युक्रेनच्या सीमेवर असलेल्या खारकीव्ह शहरात काही विद्यार्थी अडकले आहेत. ते व्हिडिओ शेअर करून मदतीची याचना करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT