ग्लोबल

अबब! युक्रेन संकटात रशियन अब्जाधीशांनी गमावले 90 अब्ज डॉलर

या सगळ्याचा रशियाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाल्याचं एका अहवालात म्हंटलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

या सगळ्याचा रशियाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाल्याचं एका अहवालात म्हंटलं आहे.

युक्रेन आणि रशियामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून धुमसत असलेल्या वादाचं रुपांतर युद्धात झालं. गुरुवारपासून युद्धाला सुरुवात झाली असून युक्रेनमधील अनेक शहरांवर बॉम्बहल्ले करण्यात आले आहेत. युक्रेनियन बेटावरील १३ सैनिकांनी आत्मसमर्पण करण्यास नकार दिल्यानं रशियन युद्धनौकेने १३ सैनिकांना ठार मारण्यात आलं आहे. दरम्यान, या सगळ्याचा रशियाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाल्याचं एका अहवालात म्हंटलं आहे. या संकटात रशियन अब्जाधीशांनी 90 अब्ज डॉलर गमावल्याची माहिती फोर्ब्सने दिली आहे.

फोर्ब्सच्या अहवालात इयान मार्टिन यांनी एका रशियन न्यूज एजन्सीचा अहवाल देत म्हटले आहे, जेव्हा अध्यक्षांनी युक्रेनवर हल्ला करण्याची घोषणा केली आहे, तेव्हापासून देशातील शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे. परिणामी येथील जनतेला संकटांचा सामना करावा लागत आहे. येथील लोकांचेही मोठे हाल झाले आहेत. दरम्यान, अमेरिका, ब्रिटन आणि युरोपियन युनियननेही रशियन बँका आणि अब्जाधीशांना त्यांच्या निर्बंधांमध्ये लक्ष्य केले आहे. त्यांची मालमत्ता गोठवण्यात आली असून त्यांच्या हालचालींवरही बंदी घालण्यात आली आहे.

फोर्ब्सने एका आकडेवारीच्या आधारे आणखी एक माहिती दिली आहे, या युद्धाच्या पार्श्वभूमीवर 16 फेब्रुवारीपासून रशियन अब्जाधीशांचे सुमारे 90 अब्ज डॉलर्सचे नुकसान झालं आहे. त्यापैकी सुमारे 39 अब्ज डॉलरचे नुकसान केवळ एका दिवशी म्हणजे गुरुवारी झाले आहे. ब्लूमबर्गनेही तसा अहवाल दिला आहे. याचा परिणाम म्हणून रशियाचा शेअर बाजार ३३ टक्क्यांनी घसरला आहे. तर इकडे रुबलचे मूल्य डॉलरच्या तुलनेत विक्रमी पातळीवर गेले आहे. ज्या रशियन अब्जाधीशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांची नावेही फोर्ब्सने दिली आहेत. या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही त्यांच्या देशातील सर्वोच्च अब्जाधीशांची बैठक बोलावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT