Russia-Ukraine War Esakal
ग्लोबल

Russia-Ukraine War: रशियाने कीवमध्ये मुलांच्या रुग्णालयावर डागलं क्षेपणास्त्र, 24 जणांचा मृत्यू; अनेक मृतदेह गाडले, बचावकार्य सुरू

Russia-Ukraine War: रशियाने आज युक्रेनमध्ये पुन्हा एकदा क्षेपणास्त्र हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. मुलांच्या सर्वांत मोठ्या रूग्णालयावर हल्ला केल्याने यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांचे मृतदेह हे ढीगाऱ्याखाली दबल्याची माहिती समोर आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

रशियाने आज युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युध्दाला आता जवळपास दोन वर्षांपेक्षा आधिक काळ लोटला आहे. मात्र, अद्याप त्याच्यांवर होणारे हल्ले आणि वाढणारी मृतांची संख्या चिंतेंची बाब ठरत आहे. अद्याप युध्दाला पुर्णविराम मिळण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. अशातच आज पुन्हा एकदा रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला आहे. मुलांच्या रूग्णालयावर रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

आज(सोमवारी) रशियाने युक्रेनची राजधानी कीव येथील काही भागांमध्ये हल्ला केला. यावेळी क्षेपणास्त्रे डागण्यात आले आहे. यामध्ये २४ जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या सैन्यांने कीवमधील मुलांच्या रूग्णालयावर क्षेपणास्त्र डागली. हे रूग्णालय जमीनदोस्त झाले असून त्याच्या ढीगाऱ्याखाली अनेक जण दबल्याची माहिती समोर आली आहे, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मलब्याखाली काही जिवंत आहेत का याचा शोध घेतला जात आहे.

युक्रेनची राजधानी कीवमध्ये लहान मुलांचे ओखमाटडिट बालरोग हॉस्पिटल आहे. यावरती आज रशियाने हाइपरसोनिक क्षेपणास्त्र या रूग्णालयावर डागलं. तर या भागात अनेक ठिकाणी बॉम्ब हल्ले करण्यात आला. या हल्ल्यात किमान 10 जणांचा मृत्यू झाला.

अनेक महिन्यांनंतर कीववर सर्वात मोठा हल्ला

रशियन लष्कराचा हा हल्ला अनेक महिन्यांतील कीववरील सर्वात मोठा हल्ला असल्याचे बोलले जात आहे. युक्रेनियन वायुसेनेने एका निवेदनात म्हटले आहे की, दिवसा उजाडलेल्या या हल्ल्यांमध्ये रशियन अत्याधुनिक शस्त्रांपैकी एक असलेल्या किन्झाल हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचा समावेश होता. किंजल आवाजाच्या 10 पट वेगाने उडते, ज्यामुळे तिला थांबवणे जवळजवळ अशक्य होते. स्फोटांनी शहरातील इमारती हादरल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT