Indian In Ukraine Sakal
ग्लोबल

'ऑपरेशन गंगा'चा आजपासून शेवटचा टप्पा; दुतावासाचं विद्यार्थ्यांना महत्वाचं आवाहन

रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हल्ले सुरु केले आहेत. यापार्श्वभूमीवर भारतीयांना वाचवण्यासाठी भारत सरकारनं ऑपरेशन गंगा सुरु केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : युक्रेनमध्ये (Ukraine War) अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या 'ऑपरेशन गंगा' मोहिमेचा (Operation Ganga) शेवटचा टप्पा आजपासून सुरु झाला आहे. यापार्श्वभूमीवर भारतीय दुतावासानं युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना लवकरत हंगेरीया सिटी सेंटर, राकोझी युटी ९० आणि बुडापेस्ट या शहरांमध्ये पोहोचण्याचं आवाहन केलं आहे. (Ukraine War last phase of Operation Ganga starts from today Imp appeal of indian embassy)

दुतावासानं ताज्या ट्विटमध्ये म्हटलं की, जे विद्यार्थी युक्रेनमध्ये स्वतः निवडलेल्या निवासस्थानी राहत आहेत. (दुतावासानं सोय केलेल्या व्यतिरिक्त) विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी हंगेरियन सीटी सेंटर, राकोक्झी युटी ९० आणि बुडापेस्ट इथं सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत पोहोचावं.

यापूर्वीच्या ट्विटमध्ये दुतावासानं भारतीयांना आवाहन केलं होतं की, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांनी आपल्या प्राथमिक माहितीसह गुगल फॉर्म तातडीनं भरावा. दुतावासानं आपल्या ट्विटरवरही हा फॉर्म शेअर केला आहे. यामध्ये प्राथमिक माहिती जसं की नाव, पासपोर्ट नंबर आणि सध्याचं ठिकाण याची माहिती तात्काळ भरावी, असं आवाहन केलं आहे.

अद्यापही हजारो विद्यार्थी अद्यापही युक्रेनच्या पूर्वभागातील कॉन्फ्लिक्ट झोनमध्ये अडकून पडले आहेत. अशा भारतीयांना बाहेर काढण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या भारतीयांना बाहेर काढणं हे सध्या सर्वात मोठं आव्हान असल्याचं भारत सरकारनं सुक्रवारी म्हटलं होतं. युक्रेनमधून सध्या 'ऑपरेशन गंगा' अंतर्गत १३,३०० भारतीय नागरिकांना ६३ विमान फेऱ्यांच्या मदतीनं मायदेशी आणण्यात आलं आहे. यांपैकी गेल्या चोवीस तासात १५ विमानं २,९०० भारतीयांना घेऊन भारतात पोहोचली आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं शनिवारी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT