Russia Ukraine War Sakal
ग्लोबल

युक्रेन रशियावर हल्ला करणार! अमेरिका देणार लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे

सकाळ डिजिटल टीम

किव्ह : गेल्या तीन महिन्याहून अधिक काळापासून रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरु असून, रशियातर्फे युक्रेनच्या पूर्वेकडील भागात रशियाचे अक्रमण सुरूच आहे. दरम्यान, रशियाच्या वाढत्या आक्रमणानंतर अमेरिका (America) युक्रेनच्या मदतीला सरसावली आहे. रशियावरील हल्ल्यासाठी अमेरिका आधिक प्रगत क्षेपणास्त्र पाठवणार आहे, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केली आहे. विशेष म्हणजे यासाठी प्लानदेखील सांगण्यात आला आहे. (Russia Ukraine War News)

युक्रेनला अधिक प्रगत रॉकेट प्रणाली आणि युद्धसामग्री प्रदान करण्याचा अमेरिकेने निश्चय केला आहे. ज्यामुळे ते युद्धभूमीवरील लक्ष्यांवर अधिक अचूकपणे हल्ला करू शकतील. परंतु, रशियावर हल्ला करू शकणारी रॉकेट यंत्रणा युक्रेनला पाठवणार नसल्याचे बायडेन यांनी स्पष्ट सांगितले आहे.

रशियन शस्त्रांपेक्षा अधिक अचूक?

व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नवीन शस्त्रांमध्ये M142 हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टमचा (HIMARS) समावेश असेल. मात्र, याचा किती पुरवठा केला जाणार आहे हे त्यांनी स्पष्ट केले नाही. ही शस्त्रे रशियन समकक्षांपेक्षा अधिक अचूक मानली जातात.

युक्रेनच्या लष्करप्रमुखांनी नुकतेच सांगितले की, रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यांना तोंड देण्यासाठी HIMARS महत्त्वपूर्ण ठरणार असून, याचा वापर पूर्वेकडील डॉनबास प्रदेशात ज्या ठिकाणी तीव्र युद्ध सुरू आहे, त्या ठिकाणी रशियन सैन्यावर हल्ला करण्यासाठी केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAT 2025 Exam: CAT 2025 परीक्षा 30 नोव्हेंबरला; निकाल जानेवारी 2026 मध्ये जाहीर होणार

मोठी बातमी! दुबार-तिबार मतदारांना नगरपरिषदेनंतर झेडपी, महापालिकेच्या मतदार यादीत नाव असल्यास तेथेसुद्धा करता येणार मतदान; काय आहे नेमका नियम? वाचा...

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा ओट्स पराठा, सोपी आहे रेसिपी

आजचे राशिभविष्य - 7 नोव्हेंबर 2025

अग्रलेख : स्फोटानंतरचा धुरळा

SCROLL FOR NEXT