Russia Ukraine War Sakal
ग्लोबल

Ukraine Weapons: बलाढ्य रशियाविरोधात आता युक्रेनने हाती घेतलं जुगाड शस्त्र; AK-74 एकमेकांना जोडत केलं असं काही...

नाटो देशांकडून त्याला सातत्याने शस्त्रं मिळत आहेत. असं असूनही, युक्रेनियन सैन्याच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी ते पुरेसं नाही

वैष्णवी कारंजकर

युक्रेनचं सैन्य रशियाविरुद्ध सर्व शक्तीनिशी लढत आहे. नाटो देशांकडून त्याला सातत्याने शस्त्रं मिळत आहेत. असं असूनही, युक्रेनियन सैन्याच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी ते पुरेसं नाही.. यामुळेच युक्रेनचं सैन्य आता ‘जुगाड’ करू पाहत आहे.

याचा ताजा पुरावा नुकताच एका व्हिडिओत पाहायला मिळाला. यात सहा एके-७४ असॉल्ट रायफल्स जोडून तयार केलेलं नवीन स्वदेशी शस्त्र दाखवलं आहे. युक्रेनचं सैन्य त्याचा वापर रशियन ड्रोनविरुद्ध करत आहे. हे मल्टीबॅरल मशीन गनसारखं दिसतं, सर्व रायफल एकाच ट्रिगरमधून गोळीबार करण्यास सक्षम आहेत. (Russia Ukraine War)

सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या या व्हिडिओमध्ये शेताच्या काठावर हे शस्त्र ठेवल्याचं दिसत आहे. यामध्ये सर्व AK-७४ रायफल लोखंडी फ्रेममध्ये गोल आकारात सेट केल्या आहेत. हे शस्त्र शेताच्या टोकाला ट्रायपॉडवर ठेवण्यात आलं आहे. यादरम्यान, आकाशात एक ड्रोन दिसतो, ज्यावर हे शस्त्र चालवणारी व्यक्ती गोळीबार करू लागते. तो ड्रोनच्या गोळीबारात पडतोय की पळून जाण्यात यशस्वी होतो हे व्हिडिओवरून स्पष्ट होत नाही.

रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष सुरू होऊन १७ महिने झाले आहेत. यादरम्यान दोन्ही देशांच्या सैन्याने आघाडीवर त्यांच्या गरजेनुसार काही नवनवीन शोधही काढले आहेत. हे प्रत्येक देशाच्या सैन्यानं केलं आहे, पण युक्रेनसाठी हे विशेष असल्याचं बोललं जात आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, सहा एके-७४ असॉल्ट रायफल असलेली उपकरणं युक्रेनियन सैन्याने ड्रोनविरुद्धच्या कारवाईत वापरली आहेत. या स्वदेशी शस्त्रामध्ये सेंट्रल चार्जिंग हँडल बसवण्यात आलं आहे, ज्यामुळं सर्व रायफल एकाच लक्ष्यावर गोळीबार करू शकतात.

AK-७४ १९७० मध्ये AK-४७ ला पर्याय म्हणून सादर करण्यात आली. युक्रेनचं सैन्य AK-७४ रायफलचा सर्वाधिक वापर करते. AK-७४ थंड भागात सहजपणे चालवता येते, जे युक्रेनच्या हवामानासाठी योग्य आहे. त्याची लाँग स्ट्रोक गॅस पिस्टन प्रणाली अत्यंत थंड परिस्थितीतही विशेषतः प्रभावी आहे.व्हिडिओमध्ये आणखी एक व्यक्ती देगत्यारेव डीपी-२७ मशीनगनमधून गोळीबार करताना दिसत आहे. हे दुसऱ्या महायुद्धापूर्वीचं जुनं डिझाइन आहे, जे अजूनही युक्रेनमध्ये वापरात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! २९ आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणांत मोठी कपात; एअर इंडियाचा मोठा निर्णय, जाणून घ्या यादी...

Fuel Crisis: मोदी बोलले, एकनाथ शिंदेंनी अस्तित्वात आणले, सरकारी ताफ्यातील वाहनं कमी करून दुसऱ्यांसाठी उदाहरण ठरले

MSP hike 2026: मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मास्टरस्ट्रोक! १४ खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ, कापूस-सूर्यफूल उत्पादकांना मोठा फायदा!

IPL 2026 : चेन्नईच्या ताफ्यात दाखल झालेला Macneil Hadley Noronha कोण? UAEत बालपण; DC, KKR, MI साठी दिलेलं ट्रायल...

Mumbai: मुंबईकरांच्या स्वयंपाकघरावर महागाईचा तडाखा! भाजीपाल्याचे भाव वाढले; जाणून घ्या सध्याचे दर...

SCROLL FOR NEXT