Russia-Ukraine war esakal
ग्लोबल

Russia Ukraine War: झेलेन्स्की यांचा निर्धार ;आगामी वर्ष युक्रेनच्या विजयाचे असेल.युद्धाचा काळ वेदनादायी, साहसी आणि ऐक्याचा

आगामी वर्ष युक्रेनच्या विजयाचे असेल.आमच्यावर हल्ला झाला तेव्हा तो आयुष्यातील सर्वात मोठा कठीण दिवस होता. युक्रेनच्या आधुनिक इतिहासातील सर्वात खडतर काळ आहे, असे त्यांनी नमूद केले. युद्धग्रस्त नागरिकांना वाऱ्यावर सोडणार नाही

सकाळ वृत्तसेवा

किव्ह - २०२३ वर्ष विजयाचे वर्ष असेल आणि त्यासाठी सर्वशक्तीनिशी लढू, असा निर्धार आज युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमीर झेलेन्स्की यांनी व्यक्त केला.

रशियाच्या आक्रमणाला एक वर्ष झालेले असताना युद्धकाळातील दिवस अतिशय दु:खद असताना साहस दाखवणारेही होते, असेही ते म्हणाले.

अध्यक्ष झेलेन्स्की यांनी ट्विट करत म्हटले, की युक्रेनच्या नागरिकांनी स्वत:ला अजिंक्य असल्याचे दाखवून दिले आहे. २०२३ वर्ष हे आमच्या विजयाचे असेल. आज सकाळी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये ते म्हणाले,

की २४ फेब्रुवारी २०२२ पासून आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि कठिण काळ सुरू झाला. त्या दिवशी आम्ही सकाळी बॉम्बच्या धमाक्याने उठलो आणि तेव्हापासून जागेच आहोत. रशियाने म्हटले होते, की युक्रेनचा ७२ तास देखील निभाव लागणार नाही. पण आपण आजही निकाराने लढा देत आहोत.

आम्ही मागे हटलो नाही. हे आपल्या धाडसाचे, शौर्याचे आणि विश्‍वासाचे प्रतीक आहे. हजारो नागरिकांनी प्राण गमावले. त्यांना मी श्रद्धांजली वाहतो. युद्धाचे वर्ष क्लेषदायक, वेदनादायी होते, पण विश्‍वासाचे आणि ऐक्याचा अनुभव देणारेही होते.

आम्ही हार मानली नाही. युद्ध जिंकण्यासाठी सर्वकाही करू, असे झेलेन्स्की म्हणाले. युद्धाच्या पहिल्या दिवसांपासून संघर्ष करत आहोत. उद्या काय होणार, हे ठाऊक नव्हते. उद्यासाठी आपल्याला लढायचे आहे, हे सर्वांनाच समजत होते आणि लढलोही, असे ते म्हणाले.

आमच्यावर हल्ला झाला तेव्हा तो आयुष्यातील सर्वात मोठा कठीण दिवस होता. युक्रेनच्या आधुनिक इतिहासातील सर्वात खडतर काळ आहे, असे त्यांनी नमूद केले. युद्धग्रस्त नागरिकांना वाऱ्यावर सोडणार नाही.

एक ना एक दिवस आपली जमीन परत मिळवू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, झेलेन्स्की यांनी आजच्या दिवसाची सुरवात लवकर केली. यादरम्यान, झेलेन्स्की यांनी युद्धात जखमी झालेल्या सैनिकांशी संवाद साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT