dimitri 
ग्लोबल

कोरोना रोग नाहीच म्हणणारा फिटनेसतज्ज्ञ अखेर मृत्युमुखी

वृत्तसंस्था

कीव्ह (युक्रेन) - कोरोना हा रोग नाहीच, असे ठामपणे म्हणणारा युक्रेनमधील एक फिटनेसतज्ज्ञ कोविड-19 याच विषाणूच्या संसर्गामुळे अखेर मृत्युमुखी पडला. दिमीत्री स्टुझ्हुक असे त्याचे नाव असून, तो 33 वर्षांचा होता.

त्याची आधीची पत्नी सोफिया यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही माहिती दिली. दिमीत्री तुर्कस्तान दौऱ्यावर गेला होता. तेथे त्याला श्वसनाचा तसेच पोटदुखीचा त्रास झाला. मायदेशी परतल्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठ दिवसांच्या उपचारानंतर या शरीरसौष्ठवपटूच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यामुळे त्याला 15 ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज देण्यात आला. पुढील उपचार घरी होणार होते; पण पुढच्याच दिवशी त्याची प्रकृती खालावली.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परत रुग्णालयात नेण्यात आले असता त्याची अवस्था गंभीर होती. तो बेशुद्धावस्थेत होता. सोफिया यांनी इन्स्टावरील तिच्या फॉलोअर्सना सांगितले की, दिमीत्रीच्या हृदयक्रियेत बिघाड झाला आहे. अशा स्थितीत कुणीही काहीही करू शकत नाही. माझ्या तीन मुलांचा पिता वाचावा म्हणून मी शक्य ती प्रत्येक गोष्ट केली; पण आता माझ्या हातात काहीच नाही.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्यानंतर काही तासांमध्ये सोफिया यांनी दिमीत्रीच्या मृत्यूची सुन्न करणारी माहिती दिली. दिमीत्री या जगात नाही, त्याचे हृदय ताण सहन करू शकले नाही, असे त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केले होते.

मलासुद्धा वाटले होते....
दिमीत्री हा लोकप्रिय फिटनेसतज्ज्ञ (इन्फ्लुएन्सर) होता. इन्स्टाग्रामवर त्याला तब्बल 11 लाख फॉलोअर्स होते. 15 ऑक्टोबर रोजी त्याने पोस्टमध्ये लिहिले होते की, आजारी पडेपर्यंत मलासुद्धा वाटले होते की कोविड नाही... हा आजार अल्पकाळ टिकणारा नसून अत्यंत गंभीर असाच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Sansad Ratna Award 2026 : संसदेत ठाण्याचा बोलबाला! म्हस्के, शिंदेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

SCROLL FOR NEXT