ग्लोबल

VIDEO : रशियाने युक्रेन नागरिकाच्या कारवर चढवला रणगाडा; पाहा काय घडलं?

सकाळ डिजिटल टीम

रशियन रणगाडा थेट एका युक्रेन नागरिकाच्या कारवर घातल्याचा हा व्हिडिओ आहे.

किव : युक्रेनमध्ये रशियाकडून जोरदार हल्ला सुरु आहे. रशियाने (Russia) त्यांचे रणगाडेही युक्रेनमध्ये (Ukraine) घुसवले असून मोठ्या प्रमाणावर हल्ले केले जात आहेत. यातच आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रशियन रणगाडा थेट एका युक्रेन नागरिकाच्या कारवर घातल्याचा हा व्हिडिओ आहे. विशेष म्हणजे रणगाडा कारवर चढवल्यानंतरही कारमधील व्यक्ती आश्चर्यकारकरित्या त्यातून बचावली आहे.

घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात रणगाडा गेल्यानंतर अडकलेला व्यक्ती कारमध्ये बसल्याचं दिसून येतं. व्हिडिओमध्ये ती व्यक्ती जिवंत असल्याचं दिसत असलं तरी त्यांना किती गंभीर जखम झालीय किंवा त्याबाबतची काही माहिती मिळू शकली नाही.

रशियाकडून सुरु असलेल्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी युक्रेनच्या नागरिकांनी शस्त्र हाती घेतले आहे. यात काही असेही लोक आहेत ज्यांनी आय़ुष्यात कधीच शस्त्रांना हात लावला नाही. मात्र तरीही देशासाठी ते सैन्यात दाखल झाले आहेत. देशाच्या संरक्षणासाठी घरच्या लोकांना सोडून जात असलेले अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. युक्रेनच्या लष्कराने १८ ते ६० वर्षे वयोगटातील कुणाही बंदूक घेऊन लढण्यासाठी तयार व्हावं असं आवाहन केलं होतं. आतापर्यंत १ हजार रशियान सैनिक मारल्याचा दावा युक्रेनने केला आहे. तर रशियाकडून याबाबत कोणतीही आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

चर्नोबिलमधून किरणोत्सर्गात वाढ

युक्रेनमधील चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाच्या सैनिकांनी काल (ता. २४) ताबा मिळविल्यानंतर आता या अणुभट्टीतून गॅमा किरणांच्या उत्सर्जनाचे प्रमाण वाढले असल्याचे युक्रेनच्या अणुऊर्जा नियंत्रण संस्थेने म्हटले आहे. हल्ल्यादरम्यान या अणुभट्टीच्या आजूबाजूला स्फोट झाल्याने आणि नंतरही या परिसरात जड वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा झाल्याने उत्सर्जनावर परिणाम झाला असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आमचे हवाई दल या प्रकल्पाचे संरक्षण करत असल्याचा दावा रशियाने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT