Ukrainian Teacher Who Survived Russian Missile Becomes Internet's Face of War 
ग्लोबल

देशासाठी काहीही करेल, युक्रेनच्या शिक्षिकेचा रक्ताने माखलेला चेहरा व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

Ukraine-Russia War : रशिया आणि यूक्रेनमध्ये जाहीर केलेल्या युद्धादरम्यान इंटरनेटवर रक्ताने माखलेल्या एका महिलेच्या चेहाऱ्याचा फोटो (Ukraine Woman Iconic Image) व्हायरल होत आहे. हा चेहरा या युद्धाची ओळख निर्माण होताना दिसत आहे. हा चेहरा यूक्रेनमधील महिला शिक्षिकेचा आहे जी युध्दाच्या पहिल्या दिवशी रशियाने युक्रेनवर केलेल्या मिसाईलच्या हल्ल्यामधून बचावली होती. ब्रिटिश न्यूज वेबसाईट The Independent च्या रिपोर्टनुसार, या महिला शिक्षिकेचे नाव ओलेना कूरिलो(५२) आहेत. ओलेन कूरिलोने (Olena Kurilo) मरेपर्यंत मायभूमीचे संरक्षणासाठी शत्रुसोबत लढण्याची शप्पथ घेतला आहे. (Ukrainian Teacher Who Survived Russian Missile Becomes Internet's Face of War)

Ukrainian Teacher Who Survived Russian Missile Becomes Internet's Face of War

ओलेनाच्या घरावर पडले रशियाचे मिसाईल

Russia-Ukraine War: ओलेना कुरिलोचे घरामध्ये यूक्रेनमध्ये उत्तरपूर्व येथील खार्कीव Kharkiv)शहर चूगेव भागात होते. रशियाने केलेल्या एका हल्ल्यामध्ये (Russian Missile Strike) तीचे घरावर जाऊन पडला आणि तिचे आयूष्य एका झटक्यात बदलले. स्फोटामुळे घराला लावलेल्या काचांचा चुरडा झाला आणि ओलेनाच्या चेहऱ्यांवर जखमा झाल्या आहेत. ओलेनाने सांगितले की, ''मी खूप भाग्यवान आहे आणि देवाच्या कृपेमुळे मी या भयानक हल्ल्यामधून वाचली आहे. ''

Ukrainian Teacher Who Survived Russian Missile Becomes Internet's Face of War

पेशाने इतिहासची शिक्षिका आहे ओलेना

ओलेना सांगते की, शाळेमध्ये मुलांनी ती इतिहास शिकविता आहे. त्यांनी कधीही वाटले नव्हते की आपल्या आयुष्यामध्ये असे घडताना कधीही अनुभवले नाही. कुरिलो म्हणते की, मी युक्रेनच्या सुरक्षेसाठी सर्वकाही करेल जे करण्यासाठी मी सक्षम आहे. माझ्याकडे जेवढी उर्जा बाकी आहे की देशाच्या संरक्षणासाठी देईल. मी माझ्या मायभूमीसोबत आहे आणि मरेपर्यंत सोबत राहील.'' रक्ताने माखलेला ओलेनाचा चेहरा इंटरनेटवर रशिया आणि यूक्रेन दरम्यान जाहीर युध्दाची ओळख बनली आहे.

Ukrainian Teacher Who Survived Russian Missile Becomes Internet's Face of War

निसर्ग प्रेमी आहे ओलेना कुरिलो

ओलेना कुरिलोने यूद्ध सूरू होण्याआधीचे कित्येक फोटो समोर आले आहे ज्यामध्ये त्या बागेमध्ये दिसत आहे. ओलेनाचे निर्सगावर प्रेम आहे. शाळेय शिक्षिका असलेली कुरिलोने फुलांने वेढलेला फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूप आनंदी दिसत आहे. पण रशियाच्या हल्लानंतर त्यांचा या आनंदाचे दुखामध्ये रुपांतर झाले आहे. घरावर झालेल्या मिसाईल हल्ल्याची आपबीती सांगताना त्या भावूक होतात. त्यांचे पूर्ण घर नष्ट झाले आहे.

रशियाला SWIFT मधून वगळण्याचे आवाहन

दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाला स्विफ्टपासून वेगळे करण्यासाठी जर्मनी आणि हंगेरी या दोन्ही देशांना पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. स्विफ्ट (सोसायटी फॉर वर्ल्डवाइड इंटरबँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन-स्विफ्ट) ही एक जागतिक वित्तीय प्रणाली आहे जी सीमे पलीकडे निधी सुरळीत आणि जलद हस्तांतरण करण्यास अनुमती देते. दरम्यान, पोलंडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत 10 लाख युक्रेनियन नागरिकांनी आपला देश सोडून त्यांच्या प्रदेशात प्रवेश केला असून त्यांना तेथे आश्रय देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Reaction On Bihar Voting : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील विक्रमी मतदानावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले...

Bus and Milk Tanker Accident : बस अन् दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; एका मुलासह तिघांचा मृत्यू, १७ प्रवासी जखमी

पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाला वेग; तीन टप्प्यात पूर्ण होणार, वैशिष्ट्ये काय आहेत?

Bihar Election 2025 Voting : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान!

Akola Raid : लाच घेताना महिला लिपिक रंगेहात पकडली; अकोला एसपी कार्यालयात एसीबीचा छापा!

SCROLL FOR NEXT