Russia Ukraine War
Russia Ukraine War Sakal
ग्लोबल

Video : युक्रेनच्या वाघिणींची डरकाळी! रशियन सैनिकांना दिला सज्जड दम...

सकाळ डिजिटल टीम

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू होऊन दोन आठवड्यांहून अधिकचा काळ उलटला आहे. दुसरीकडे रशियाकडून युक्रेनवर हल्ले वाढवले जात असताना, युक्रेनच्या महिला सैनिकांनी रशियन सैन्याला ‘खूप उशीर होण्यापूर्वी आत्मसमर्पण’ करा असा सज्जड दम दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेक वेळा शेअर करण्यात आला आहे. (Ukrainian Women Soldiers Warn To Russian Troops )

युक्रेनच्या सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्सच्या स्परावडीच्या टेलिग्राम चॅनलद्वारे प्रकाशित झालेल्या या व्हिडिओमध्ये महिला सैनिक आपल्या राष्ट्राचे रक्षण करण्याची शपथ घेत असताना अतुलनीय धैर्य दाखवत असून, “तुला इथे कोणीही फुलं घेऊन भेटणार नसून खूप उशीर होण्यापूर्वी आत्मसमर्पण करा, असा दम देताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. एवढेच नव्हे तर, “आम्ही शूट करायला तयार आहोत, तू मला ऐकतोस का?, यू बास्ट**ड? शूट करा!,” असे युक्रेनियन महिला सैनिक रशियन सैन्याला म्हणत आहेत.

कीव्ह इंडिपेंडंटच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने एक आदेश जारी केला होता. ज्यामुळे युद्धासारखी परिस्थिती उद्भवल्यास महिलांच्या भरतीची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. यासाठी जवळपास 100 व्यावसायिक क्षेत्रातील 18 ते 60 वर्षे वयोगटातील महिलांना त्यांच्या स्थानिक भरती कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक असल्याचे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफ डू प्लेसिसची फिफ्टी, तर विराटने पुन्हा मिळवली ऑरेंज कॅप

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT