अँटोनिओ गुटेरेस sakal
ग्लोबल

जगाची वाटचाल 'आपत्तीजनक तापमान वाढी'कडे : अँटोनियो गुटेरेस

UN चे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले की, ग्लासगो येथील Cop26 ला एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी बाकी आहे

राहुल शेळके

नैरोबी : मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या 'Emissions Gap Report 2021: The Heat Is On' या अहवालानुसार, देशांच्या सुधारित राष्ट्रीय हवामान कृती योजनांनी (नॅशनल डिटरमाइंड कंट्रिब्युशन/NDC) वार्षिक हरितगृह वायू उत्सर्जन पूर्वीच्या ठरावांच्या तुलनेत केवळ 7.5 टक्क्यांनी कमी केले. अहवालात एनडीसी, राष्ट्रीय कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उपायांचा सोबत 2030 च्या इतर ठरावांचे देखील पुनरावलोकन केले आहे जे अद्याप अधिकृतपणे सादर केले गेले नाहीत.

सध्याचा ठराव पुरेसा नाही, असे स्पष्टीकरण यूएन एजन्सीने दिले आहे. ग्लोबल वार्मिंग 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा कमी मर्यादित ठेवण्यासाठी, हरितगृह उत्सर्जनात 55 टक्के कपात करणे आवश्यक आहे. 1.5 °C ही तापमान वाढीची श्रेणी आहे जी पृथ्वी आणि मानवतेवर हवामान बदलाचे परिणाम मर्यादित करू शकते.

UN चे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले की, ग्लासगो येथील Cop26 ला एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी बाकी आहे आणि जग अजूनही जागतिक तापमानात विनाशकारी वाढीच्या मार्गावर आहे.

युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम (UNEP) च्या अहवालात असे दिसून आले आहे की पॅरिस हवामान करारामध्ये निर्धारित केलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी हवामान कृतीसाठी नवीन आणि सुधारित ठराव पुरेसे नाहीत. स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे होणाऱ्या UN च्या वार्षिक हवामान परिषदेच्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, या शतकात जागतिक तापमानात किमान 2.7 अंश सेल्सिअस वाढ होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladeshi Migrants : राज्यात बांग्लादेशी घुसखोरांना बसणार आळा, सरकारने उचलले मोठे पाऊल

Virat Kohli चे फ्युचर २०१६ मध्येच सांगितले गेले होते... आता खरं ठरतंय; वाचा निवृत्तीबद्दल पुढचं भविष्य काय सांगत

Crime: झाडाला बांधले, कपडे फाडले अन् बेदम मारहाण... भावासह प्रसिद्ध गायिकेसोबत अमानुष कृत्य, धक्कादायक कारण समोर

Satara Female Doctor : ती बीडची आहे म्हणून जर... धनंजय मुंडे साताऱ्यातील महिला डॉक्टर प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?

Local Megablock: मुंबईकरांनो लक्ष द्या! शनिवार आणि रविवारी मेगाब्लॉक; कधी अन् कुठे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT