UN experts slam Pakistan Esakal
ग्लोबल

UN experts slam Pakistan: हिंदू-ख्रिश्चन महिलांचे सक्तीने विवाह अन् धर्मांतर; संयुक्त राष्ट्रसंघाने पाकिस्तानला फटकारलं

UN experts slam Pakistan: संयुक्त राष्ट्रांच्या (UN) तज्ज्ञांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'ख्रिश्चन आणि हिंदू मुलींना सक्तीचे धर्मांतर, अपहरण, तस्करी, बालविवाह, जबरदस्ती विवाह, घरगुती गुलामगिरी आणि लैंगिक हिंसाचाराचा सामना करावा लागतो.'

अंकिता खाणे (Ankita Khane)

UN experts slam Pakistan: अल्पसंख्याक महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून पाकिस्तान पुन्हा एकदा निशाण्यावर आला आहे. हिंदू आणि ख्रिश्चन महिलांना पुरेसे संरक्षण न दिल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांनी इस्लामाबादवर टीका केली आहे. पाकिस्तानमधील अल्पसंख्याक समुदायातील तरुण महिला आणि मुलींना संरक्षण मिळत नसल्याबद्दल विशेषतः ख्रिश्चन आणि हिंदू समुदाय संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांनी निराशा व्यक्त केली.

ते म्हणाले की, देशाने संबंधित आंतरराष्ट्रीय करारांनुसार आपली जबाबदारी पूर्ण करणे आवश्यक आहे. देशातील प्रत्येक घटकाला समान अधिकार मिळावेत.

संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांनी सांगितले की, 'ख्रिश्चन आणि हिंदू मुलींना जबरदस्तीने धर्मांतर, अपहरण, तस्करी, बालविवाह, बळजबरी विवाह, घरगुती गुलामगिरी आणि लैंगिक हिंसाचाराचा सामना करावा लागतो.' धार्मिक अल्पसंख्याक समुदायातील महिला आणि मुलींशी अशी वागणूक समर्थनीय ठरू शकत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा सर्व घटना तात्काळ थांबवायला हव्यात.

'जबरदस्तीच्या धर्मांतराच्या घटना थांबवण्याची गरज'

तज्ज्ञांनी सांगितले की, करारांनुसार पाकिस्तानला आपली जबाबदारी पाळावी लागेल. तसेच सक्तीच्या धर्मांतराच्या घटना थांबवण्याची गरज आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतात पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेजवळ एक ऐतिहासिक हिंदू मंदिर पाडण्यात आल्याच्या वेळी तज्ज्ञांनी इस्लामाबादला फटकारले आहे.

तसेच, या जागेवर व्यावसायिक संकुलाचे बांधकाम सुरू झाले आहे, जे 1947 पासून मूळ रहिवासी भारतात स्थलांतरित झाल्यानंतर बंद होते. 'खैबर मंदिर' खैबर जिल्ह्यातील लेंडी कोटल बाजार या सीमावर्ती शहरात वसले होते, परंतु गेल्या काही वर्षांत ते हळूहळू नाहीसे होत होते. सुमारे 10-15 दिवसांपूर्वी या ठिकाणी बांधकाम सुरू झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitesh Rane : शहराचे नाव बदलण्याचे षड्‍यंत्र; मंत्री नीतेश राणेंची शिवसेना यूबीटीवर टीका

Viral Video : तरुणीची मदत करणे तरुणाला चांगलेच पडले महागात, तुम्ही देखील 'ही' चूक करु नका; पाहा नेमकं काय घडलं ?

हुंडाबळी प्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा, सून ५ महिन्यांनी सापडली पुण्यात; पोलिसांनी घेतली ताब्यात

Kolhapur Airport : भाजप सरकारच्या धोरणांमुळे कोल्हापूर विमानतळाची झेप; सात वर्षांत साडेसात लाखांहून अधिक प्रवासी

Education News : निवडणुकीच्या रणधुमाळीत एमपीएससीची परीक्षा; प्रचाराच्या रॅलींमुळे परीक्षार्थींची मोठी तारांबळ

SCROLL FOR NEXT