Unique Record Viral News  esakal
ग्लोबल

Unique Record Viral News : किती मजा..! आई-वडिलांसह 7 मुलांचाही वाढदिवस एकाच दिवशी, कसा?

एका ९ जणांच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांचा वाढदिवस एकाच दिवशी. या अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे.

धनश्री भावसार-बगाडे

Pakistani Family Unique Record : पाकिस्तानच्या लरकाना इथे राहणाऱ्या एका कुटुंबाच्या नावे एक आगळावेगळा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. स्वतः गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्यांची कहाणी शेअर केली आहे. या ९ सदस्यांच्या कुटुंबात एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे त्यांचा जन्मदिवस. या कुटुंबातले सर्व सदस्य १ ऑगस्टला जन्मले आहेत. ते सर्व एकाच दिवशी आपला वाढदिवस साजरा करतात.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या नुसार कुटुंबात आमिर अली, त्यांची पत्नी खुदेजा आणि त्यांची ७ मुले यांचा या रेकॉर्डमध्ये समावेश आहे. या ७ मुलांमध्ये ससुई, सपना या जुळ्या मुली आहेत. आमिर-अंबर, अम्मार-अहमर ही जुळी मुले आहेत. याशिवाय सिंधू नावाची अजून एक मुलगी आहे. या सगळ्यांचे वय १९ ते ३० च्या दरम्यान आहे.

यातली अजून एक रंजक गोष्ट म्हणजे या ७ मुलांबरोबर त्यांच्या आई-वडिलांचाही वाढदिवस १ ऑगस्टला आहे. सगळ्यांचे जन्मवर्ष वेगवेगळे असले तरी महिना आणि तारीख एकच आहे. आणि हा एक रेकॉर्ड झाला आहे. कोणत्याच कुटुंबात एवढ्या सगळ्या लोकांना वाढदिवस एकाच दिवशी येत नाही.

हा रेकॉर्ड यापूर्वी कमिंस परिवार (यूएसए) च्या पाच मुलांच्या नावे नोंदवला गेला होता. त्यांचा जन्म १९५२ ते १९६६ दरम्यान २० फेब्रुवारी ला झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT