United Nations Sakal
ग्लोबल

सावधगिरी बाळगा, नाहीतर पुन्हा धोका; संयुक्त राष्ट्राचा भारताला इशारा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत संयुक्त राष्ट्रांनी भारताला सावधगिरीचा इशारा दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) भारताला सावधगिरीचा इशारा दिला आहे. दुसऱ्या लाटेमध्ये भारतात दोन लाख चाळीस हजार लोकांना प्राण गमवावे लागले होते आणि अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले होते. ‘ओमिक्रॉन’बद्दल सावधगिरी न बाळगल्यास तशीच परिस्थिती उद्भवू शकते, असे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे. (Corona And Omicron Variant Updates)

कोरोना संकटानंतरच्या जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती दर्शविणारा संयुक्त राष्ट्रांचा जागतिक आर्थिक परिस्थिती अहवाल आज प्रकाशित झाला. या अहवालानुसार, भारतातील परिस्थिती गेल्या वर्षीसारखी राहण्याची शक्यता असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत पूर्वीप्रमाणेच नुकसान होण्याची भीती असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतात, मागील वर्षी एप्रिल ते जून या कालावधीत कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएन्टमुळे हाहाकार उडाला होता.

जगावरही परिणाम होणार

ज्या प्रकारे ओमिक्रॉनचा संसर्ग फैलावत आहे, त्याचा जगभरातील अर्थव्यवस्थांवर विपरीत परिणाम होणे अटळ आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी सर्वांना लस देण्यापासून ते इतर उपाययोजनांबाबत वैश्विक दृष्टीकोन बाळगला नाही तर या संसर्गाचा उपद्रव कमी होणार नाही. दक्षिण आशियामध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याने नवे व्हेरिएन्ट येण्याची आणि त्यामुळे परिस्थिती बिकट होण्याचे भाकितही या अहवालात वर्तविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VAIBHAV SURYAVANSHI: ११ चेंडूत अर्धशतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी फायनलमध्ये 'असा' झाला आऊट; नक्की काय घडलं?

ChatGPT मध्ये मोठं अपडेट! आता वेळेवर मिळणार सगळे अलर्ट; जाणून घ्या कसं काम करतंय हे फीचर? आहे तुमच्या फायद्याचं

नॅशनल हायवे अन् एक्सप्रेस वेवर हवामानानुसार बदलणार वेग मर्यादा; उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान

BEST Bus: 'नीट' परीक्षेसाठी 'बेस्ट'ची विशेष सेवा; २४ मार्गांवर ६० अतिरिक्त बसेस, दिवसभरात १८० फेऱ्यांचे नियोजन

Akole Leopard Attack: लेक किंचाळली अन् वडील धावले! बिबट्याच्या तावडीतून ४ वर्षीय अवनीची सुटका; अकोल्यातील थरारक घटना..

SCROLL FOR NEXT