ग्लोबल

UNSC : अफगाणिस्तानातील शरणार्थींना स्विकारण्याचं जगाला आवाहन

अफगाणिस्तानावर तालिबाननं केलेल्या कब्ज्यामुळं निर्माण झाली अनागोंदी

Amit Ujagare (अमित उजागरे)

संयुक्त राष्ट्रे : अफगाणिस्तानावर तालिबाननं केलेल्या कब्ज्यामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चेसाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं सोमवारी एक तातडीची बैठक बोलावली होती. गेल्या आठवड्याभरातील सुरक्षा परिषदेची ही दुसरी बैठक आहे. या बैठकीत संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी म्हटलं की, "मी तालिबानला आवाहन करतो की त्यांनी लोकांच्या जीवाचं रक्षणासाठी संयम राखावा आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याला प्राधान्य द्यावं.

गुटेरस पुढे म्हणाले, "अफगाणिस्तानात सुरु असलेल्या संघर्षात हजारो लोकांना घर सोडण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. काबूलने देशभरातील प्रांतांमधून जमा झालेल्या विस्थापित लोकांची गर्दी पाहिली आहे. मी सर्व पक्षांना नागरिकांचं संरक्षण आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांची आठवण करुन देतो. मी सर्व सदस्यांना आवाहन करतो की, त्यांनी लोकांच्या जीवनावश्यक सेवा आणि मदतीसाठी विनाअडथळा मदत पोहोचवावी.

अफगाणिस्तानात अचानक निर्माण झालेल्या मानवी संकटावर बोलताना गुटेरस म्हणाले, "मी सर्व देशांना शरणार्थींना स्विकारण्याचं आवाहन करतो. अफगाणिस्तानात जागतिक दहशतवादाच्या संकटाच्या मुकाबल्यासाठी संपूर्ण जगाला एकजूट व्हावं लागेल. अफगाणिस्तानला दहशतवादी संघटनांसाठी सुरक्षित आश्रय बनू न देण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदयाला एकत्र यावं लागेल. मी सर्व सदस्यांना अफगाणिस्तानातील नागरिकांच्या संरक्षणाप्रति त्यांच्या जबाबदारीची आठवण करुन देतो."

संयुक्त राष्ट्रांतील अफगाणिस्तानचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी गुलाम एम. इसाकजई यांनी म्हटलं की, "आज मी अफगाणिस्तानातील लाखो लोकांच्यावतीनं बोलत आहे. मी त्या लाखो अफगाणी महिला आणि मुलींच्यावतीनं बोलत आहे, ज्या शाळेत जाण्यापासून आणि राजकीय-आर्थिक आणि सामाजिक जीवनात भाग घेण्याचं स्वातंत्र्य गमावणार आहेत. तालिबान दोहा आणि इतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर केलेल्या दाव्यांचा आणि प्रतिज्ञांचा सन्मान करत नाहीए. आज अफगाणिस्तानातील लोक भीतीच्या वातावरणात जगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT