Israel Hamas war esakal
ग्लोबल

Israel Hamas War: हमासला पूर्णपणे नेस्तनाबूत केले जात नाही, तोपर्यंत गाझा पट्टीत युद्ध सुरू ठेवू

Marathi Global News : इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा कडक ईशारा

Chinmay Jagtap

‘‘हमासला पूर्णपणे नेस्तनाबूत केले जात नाही, तोपर्यंत गाझा पट्टीत युद्ध सुरू ठेवू,’’ असा कडक इशारा इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी बुधवारी (ता.१४) दिला.

इस्राईल आणि हमासमधील संघर्ष दोन महिन्यांनंतरही सुरूच आहे. हा संघर्ष थांबविण्यासाठी शस्त्रसंधी करण्याचा दबाव जागतिक पातळीवरून इस्राईलवर येत असला तरी आणि अमेरिकेतही युद्धामुळे अस्वस्थता वाढत असली तरी इस्राईलने शस्त्रसंधीचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.

सहा आठवड्यांच्या विनाशकारी युद्धानंतरही इस्राईलचे लष्करी बळ कमकुवत करण्यासाठी लढण्यास हमास सक्षम आहे, असे आव्हान या दहशतवादी संघटनेने दिले आहे. नेतान्याहू म्हणाले, ‘‘आम्ही शेवटपर्यंत युद्ध सुरू ठेवू. आंतरराष्ट्रीय दबाव असला तरी मोठ्या दुःखाने मी हे सांगत आहे. आम्हाला कोणी रोखू शकत नाही. आम्ही शेवटाकडे, विजयाकडे चाललो आहे. यात काहीही वावगे नाही.’’

इस्राईलचे परराष्ट्र मंत्री एली कोहेन म्हणाले, की आंतरराष्ट्रीय पाठिंब्यासह किंवा पाठिंब्याविना आम्ही हमासशी युद्ध सुरू ठेवू. कोहेन यांनी त्यांच्या मंत्रालयाच्या वतीने एका मुत्सद्द्याला सांगितले, की सध्याच्या टप्प्यात शस्त्रसंधी करणे हे हमाससाठी भेट असेल. यातून त्यांना पुन्हा हल्ले करण्याची आणि इस्रायली नागरिकांना धमकविण्याची मुभा मिळेल.

गाझातील युद्ध थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव वाढत असताना अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान हे नेतान्याहू आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी इस्राईलला जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT