donald trump 
ग्लोबल

अमेरिकेकडून Pfizer लशीला हिरवा कंदिल; ट्रम्प म्हणाले, 24 तासांच्या आत दिली जाईल पहिली लस 

सकाळवृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या फूड एँड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशनच्या एका विशेषज्ज्ञांच्या समितीने गुरुवारी कोविड-19 च्या विरोधात प्रभावी असणाऱ्या Pfizer-BioNTech लशीच्या आपत्कालीन वापरासाठी हिरवा कंदिल दाखवला आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी FDA ने त्याच्या वापरासाठी औपचारिक मान्यता दिली आहे. यामुळे देशभरात फायझरच्या लशीचे लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

FDA चे मुख्य वैज्ञानिक डेनिस हिंटन यांनी Pfizer चे कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहून कळवलं आहे की, मी कोविड-19 ला आळा घालण्यासाठी म्हणून Pfizer-BioNTech लशीच्या आपत्कालीन वापरासाठी अधिकृत मान्यता  देत आहे. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील म्हटलं की, आता येत्या 24 तासांच्या आतच देशात पहिली लस दिली जाऊन लसीकरणास सुरवात होईल.  

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ट्विटरवर जाहीर केलेल्या एका टेलीव्हीजन संबोधनात म्हटलं की, पहिली लस 24 तासांच्या आत अगदी कमी वेळात दिली जाईल. ट्रम्प यांनी पुढे म्हटलं की, FedEx आणि UPS च्या सोबत एकत्र येत आम्ही आधीच देशातील प्रत्येक राज्य आणि जीप कोडला लस पाठवणे सुरु केलं आहे. राज्याचे गव्हर्नर ठरवतील की सर्वांत आधी लस त्या त्या राज्यात कुणाला दिली जाईल.

ट्रम्प यांनी म्हटलं की, पहिल्या खेपेत वरिष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि आजारी लोकांना आधी लस दिली जावी. यामुळे हॉस्पिटलमध्ये भर्ती होण्याची प्रकरणे तसेच कोरोनामुळे होणारे मृत्यू देखील अभूतपूर्वरित्या कमी होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : ड्रग्स तस्करी प्रकरणी मुंबईच्या पुरवठादारासह दोघांना पोलिस कोठडी

कोणताच संघ ICCपेक्षा मोठा नाही, जय शहांनी पाकिस्तान-बांगलादेशला सुनावलं; तर टीम इंडियाला...

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..

SCROLL FOR NEXT