Us Cancels Major Military Aid To Pakistan Worth 300 Million Usd
Us Cancels Major Military Aid To Pakistan Worth 300 Million Usd 
ग्लोबल

अमेरिकेकडून पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी

वृत्तसंस्था

न्यूयॉर्क : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि अमेरिकेमध्ये काही मुद्यांवरुन वाद सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून दहशतवादाच्या मुद्यावरुन दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. पाकिस्तानला दणका देताना अमेरिकेने 300 मिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास 2100 कोटी रुपयांची आर्थिक मदत रोखली आहे. 

दहशतवाद्यांविरोधात कोणतीही ठोस कारवाई न केल्याबद्दल अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा आणखी डागाळणार आहे.

दरम्यान, काल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेच्या एकतर्फी मागण्या पाकिस्तान मान्य करणार नाही, असे जाहिररित्या म्हटले होते. तसेच पाकिस्तानच्या राष्ट्रीय हिताला बाधक ठरणारे सर्व करार रद्द केले जातील, असा इशाराही खान यांनी दिला होता. पाकिस्तानला अमेरिकेशी सन्मानपूर्वक संबंध ठेवायचे आहेत. तसेच भारत, अफगाणिस्तान आणि इराणबरोबरही शांततापूर्ण संबंध ठेवायचे आहेत. मात्र अमेरिकेच्या एकतर्फी मागण्या पाकिस्तान मान्य करणार नाही, असे त्यांनी म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT