us capitol hill 
ग्लोबल

अमेरिकेत कॅपिटल हिल परिसर लॉकडाऊन; दोन पोलिस अधिकाऱ्यांना कारने चिरडलं

सकाळ डिजिटल टीम

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या कॅपिटल हिल परिसरात गोळीबाराची घटना झाल्यानंतर इमारत परिसर सील करण्यात आला आहे. युएस कॅपिटल पोलिसांनी सांगितंल की, इमारतीला सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलं आहे. तसंच स्टाफमधील सदस्यांना आत किंवा बाहेर जाण्यास बंदी घातली आहे. युएस कॅपिटल बिल्डिंगजवळ एका गाडीने दोन पोलिस कर्मचाऱ्यांना चिरडलं. यामध्ये एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी कॅपिटल बिल्डिंग सील केली. 

कारने धडक दिल्यानंतर पोलिसांनी कॅपिटल कॉम्प्लेक्सच्या बॅरिकेडजवळ गोळीबारही केला. यामध्ये एका संशयिताला गोळी लागली असून त्याचा मृत्यूही झाला आहे. पोलिसांनी शुक्रवारी दुपारी युएस कॅपिटल बंद केली. कॅपिटल बिल्डिंग सुरक्षेच्या कारणामुळे बंद करण्यात आली असून सध्या कर्मचाऱ्यांना आत किंवा बाहेर ये जा करण्यास बंदी घातली आहे. 

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी युएस कपिटल कॉम्प्लेक्सला सुरक्षेला धोका असल्यानं लॉकडाऊन केलं आहे. तसंच काँग्रेस ऑफिस, इमारतीच्या परिसरातील रस्तेही बंद करण्यात आले आहेत. तसंच रस्त्यावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅपिटल इमारतीच्या परिसरातील एका चौकीवर वाहनाने धडक दिला. यामध्ये दोन पोलिस अधिकाऱी जखमी झाले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. एका संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली जात आबे, कारने धडक दिल्यानंतर एकाने चाकू हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यावर मंत्र्यांचा यु-टर्न! संघटनांच्या संतापानंतर सरकारची माघार; थेट अटकेच्या मुद्द्यावर भूमिका बदलली

IPL 2026 मध्ये २-३ हजार धावा करायच्या आहेत! वैभव सूर्यवंशीचा आत्मविश्वास पाहून सारेच चक्रावले; म्हणाला, वैयक्तिक विक्रम...

Iran Israel War Anxiety : युद्धाची चाहूल आणि मनातली घालमेल; असुरक्षिततेच्या काळात भावनिक स्थैर्य कसे राखाल?

Gambhir on Dhoni: 'माझी इच्छा आहे की एक दिवस त्याने माझ्या जागेवर यावं आणि मी त्याला...' धोनीबद्दल काय म्हणाला गंभीर?

Latest Marathi Update : नाशिकच्या इगतपुरीत अल्पवयीन युवतीवर अत्याचार प्रकरणाने खळबळ

SCROLL FOR NEXT