ग्लोबल

लस घेतलेल्यांना मास्कची गरज नाही; बायडेन यांची मोठी घोषणा

जगभरात गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ कोरोनाने थैमान घातलं आहे. याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे.

सूरज यादव

जगभरात गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ कोरोनाने थैमान घातलं आहे. याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे.

वॉशिंग्टन - जगभरात गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ कोरोनाने (Corona Virus) थैमान घातलं आहे. याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला (America) बसला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, मास्क यांचा वापर जवळपास सर्वच देशांमध्ये बंधनकारक आहे. मात्र आता काही देश हळू हळू मास्क वापरण्याची गरज नसल्याचं सांगत नियम शिथिल करत आहेत. यात पहिल्यांदा इस्रायलने (Israel) त्यांच्या देशात मास्क फ्रीची घोषणा केली होती. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनीही मास्कबाबात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यांचे लसीकरण पूर्ण झालं आहे त्यांनी मास्क घालण्याची गरज नसल्याचं जो बायडेन यांनी जाहीर केलं. यावेळी त्यांनी सीडीसीने जाहीर केलेल्या नियमावलीबाबतही त्यांनी माहिती बायडेन यांनी दिली. (US CDCs new guidelines no mask usage for vaccinated people says joe biden)

सीडीसीने नवीन नियमावली जाहीर केली आहे त्यानुसार अमेरिकेत ज्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे त्यांना आता मास्क घालण्याची आवश्यकता नाही. पण ज्यांचे लसीकरण अजुनही झालेलं नाही त्यांना मास्क बंधनकारक असेल. लसीकरण पूर्ण होईपर्यंत त्यांनी स्वत:ची सुरक्षा करणं गरजेचं आहे असंही यामध्ये सांगण्यात आलं आहे. व्हाइट हाऊसमध्ये बोलताना बायडेन यांनी म्हटलं की, सीडीसीने मास्कबाबत शिफारस केली असून नवे नियम घरात तसेच घराबाहेरही लागू आहेत. इट्स ग्रेट डे, नागरिकांचे लसीकरण कमी वेळेत केल्यामुळेच आपल्याला हे यश मिळवता आल्याचंही बायडेन यांनी म्हटलं आहे.

जो बायडेन म्हणाले की, मागील 144 दिवसांपासून देशात लसीकरण करत असताना जगाचंही नेतृत्व आपण केलं. संशोधक, शास्त्रज्ञांसह अनेकांनी यासाठी मेहनत घेतली आणि त्यामुळेच हे शक्य होऊ शकलं. अमेरिकेतील जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण व्हावं यासाठी दिवसरात्र झटणाऱ्या लोकांमुळे आपण हा टप्पा गाठू शकलो असंही बायडेन यांनी म्हटलं.

अमेरिकेत आतापर्यंत 3 कोटी 36 लाख 15 हजार जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 5 लाख 98 हजार जणांना प्राण गमवावे लागले आहेत. तर सध्या अमेरिकेत 63 लाख 58 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 2 कोटी 66 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Election : माजी नगरसेवकांनी शड्डू ठोकल्याने चुरस; मतांची गोळाबेरीज करण्याचे आव्हान, मताधिक्य कोणाला याचीच उत्सुकता

Pune Crime:'तरुणीशी मैत्रीच्या संबंधातून कात्रजजवळ तरुणाचा खून'; प्रेमाच्या नात्यातून मैत्रीचा बेरंग, नेमकं काय घडलं?

Long Weekend ला निघालात? सातारा–पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी; खेड–शिवापूर टोलनाक्यावर काय स्थिती?

Kolhapur Accident News : राबणाऱ्या हातांवर काळाचा घाला, कोल्हापुरातील आजऱ्याजवळ भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; एक महिला गंभीर

Indian nationals arrested USA: अमेरिकेत ३० भारतीय नागरिकांना अटक, व्यावसायिक ट्रक चालवताना पकडले; कोणता गुन्हा?

SCROLL FOR NEXT