hydroxychloroquine 
ग्लोबल

अमेरिकेने केला हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाची गुणवत्ता खराब असल्याचा दावा

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन - भारताकडून कोरोना विरोधातील लढ्यासाठी पुरवण्यात येणाऱ्या हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाची गुणवत्ता खराब असल्याचा दावा अमेरिकेतील वैज्ञानिक डॉ. रिक ब्राईट यांनी मंगळवारी अमेरिकेच्या विशेष काउंसिल ऑफिसमध्ये केला असून यावेळी आपण फेडरल ड्रग असोसिएशनला (एफडीए) याबाबत माहिती दिल्यावर त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

ब्राईट यांनी केवळ हाइड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या गुणवत्तेबाबतच नव्हे तर अमेरिकेला इतर देशांकडून पुरवण्यात आलेल्या पीपीई किट्सच्या गुणवत्ते बाबतही संशय व्यक्त केलेल आहे. दरम्यान, ब्राइटयांना सध्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यापूर्वी ब्राईट हे अमेरिकेच्या आरोग्य आणि मानवी सेवा विभागातर्फे (एचएचएस) चालवल्या जाणाऱ्या बायोमेडिकल प्रगत संशोधन विकास प्राधिकरणाचे प्रमुख होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आश्रमशाळांना युद्धाची झळ, गॅस तुटवड्याचा १८ हजार विद्यार्थ्यांना फटका; भोजन व्यवस्थेसमोर मोठे संकट

नाना पाटेकर ते नसीरुद्दीन शाह, एमएक्स प्लेयरवर २०२६ मध्ये येणार १५० नवीन शो; सगळे पाहता येणार फ्री

‘कुरळे ब्रदर्स’ची धमाल आता घरबसल्या! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ आता ओटीटीवर, कधी कुठे पाहाल?

नागपूरमध्ये ९० टक्के मोबाईल टॉवर अनधिकृत? खळबळजनक आरोपानंतर राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, आणणार नवं धोरण!

LPG Crisis: दररोज ७५ लाख बुकिंग; तरीही गॅस तुटवडा नाही, साठेबाजी आणि काळाबाजारावर लगाम; केंद्राने दिले कडक निर्देश

SCROLL FOR NEXT