wechat 
ग्लोबल

अमेरिकी न्यायालयाने वुइचॅटवरील बंदी रोखली  

पीटीआय

न्यूयॉर्क - अमेरिका आणि चीन यांच्यातील वादाचे एक कारण बनलेल्या वुइचॅट अॅपवरील बंदीला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. हे अॅप डाउनलोड करू नये, असा फतवा ट्रम्प प्रशासनाने काढला होता.

या अॅपची मालकी टेनसेंट या चिनी कंपनीकडे आहे. २१ सप्टेंबरपासून ही बंदी लागू होणार होती. त्यास काही तास बाकी असताना कॅलिफोर्नियातील न्यायालयाने रविवारी हा देशव्यापी आदेश जारी केला. मुक्त संभाषणाच्या अधिकारासंदर्भात न्यायाधीशांनी चिंता व्यक्त केली.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आगामी निवडणुकीच्या प्रचारात चीनच्या विरोधावर भर दिला आहे. चीनमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे. निवडणुकीतील डेमोक्रॅटिक प्रतिस्पर्धी ज्यो बायडेन चीनच्या बाबतीत कमजोर भूमिका घेतात, असा आरोप ट्रम्प यांनी वारंवार केला आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अमेरिकेत येणारे किंवा काम करणारे चिनी नागरिक वुइचॅट मोठ्या प्रमाणावर वापरतात. चिनी-अमेरिकी नागरिकांकडून नातेवाइकांशी संवाद साधण्यासाठी याचा वापर केला जातो.
- विल्यम रेंश, वॉशिंग्टनमधील  अभ्यासक

वुइचॅट अन् वाद
    बंदी लागू झाली असती, तर वुइचॅट अॅपचा वेग मंदावला असता
    युजरना कुटुंबीय आणि मित्रांच्या साथीत व्हिडिओ चॅट करणे शक्य झाले नसते
    वुइचॅटचा दररोज वापर करणारे अमेरिकेतील युजर सुमारे एक कोटी ९० लाख
    चिनी अॅपची मालकी असलेल्या कंपन्यांकडून अमेरिकी नागरिकांच्या वैयक्तिक माहितीची चोरी असा ट्रम्प यांचा आरोप
    चीनकडून पुराव्यांची मागणी; पण ट्रम्प प्रशासनाकडून प्रतिसाद नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

आगमन मिरवणुकीत पुन्हा अपघात! ट्रॉली उलटल्याने गणेशमूर्ती कोसळली; अंगावर शहारा येणारा Video Viral

BRICS Summit 2026 : एकाच शक्तीचं कायम वर्चस्व शक्य नाही’; BRICS मध्ये जिनपिंग यांची अमेरिकेवर टीका, पंतप्रधान मोदींचे मानले आभार

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Ganeshotsav Security : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ व शेटफळमध्ये पोलिसांचे पथसंचलन; गुन्हेगारांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT