us 
ग्लोबल

US Election: निवडणुकीनंतर हिंसाचाराची भीती; नागरिकांनी दरवाजे, खिडक्या प्लायवूडने केले बंद

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- सर्व जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीचे मतदान आज पार पडणार आहे. पण, निवडणुकीनंतर अशांतता आणि हिंसा पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील नागरिक आणि व्यावसायिक आपल्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी खबरदारी घेताना दिसत आहेत. रस्त्यावर हिंसाचार घडून येईल या भीतीने अनेक मालकांनी आपल्या दुकानांचे दरवाजे आणि काचेच्या खिडक्या लाकडांनी झाकल्या आहेत. 

अमेरिकेतील वॉशिंग्टन, न्यूयॉर्कसह अनेक शहरांमध्ये व्यायसायिक कार्यालये, दुकाणे, बँक, हॉटेल, रेस्टॉरंट यांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लूट आणि नासधूद केली जाऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. काही ठिकाणी दुकानांना सुरक्षित करण्यात आले आहेत. काचेच्या खिडक्या आणि दरवाजे लाकडांनी झाकण्यात आले आहे. अनेक ठिकाणी दुकाने आणि व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. काही ठिकाणी अधिकची सुरक्षा पुरवण्यात आली आहे, तर पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. 

Vienna Terror Attack: व्हिएन्नात मुंबईसारखा दहशतवादी हल्ला, दिसेल त्याच्यावर...

अमेरिकेतील निवडणुकीचा निकाल दोन्ही पक्षांना मान्य असणार नाहीये. त्याच बरोबर काही समाजकंटक या परिस्थितीचा फायदा घेत लुट आणि चोरी करु शकतात. या पार्श्वभूमीवर अमेरिकेत कडोकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलिसांची तैनाती वाढवण्यात आली आहे. शिवाय व्हाईट हाऊस भोवतालची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. वॉशिंग्टन पोलिसांनी व्हाईट हाऊस जवळील सर्व रस्ते बंद केल्याचे जाहीर केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना कठीण परिस्थितीची तयारी म्हणून आवश्यक वस्तूंचा साठा करण्यास सांगण्यात आले आहे. 

अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका ठरल्याप्रमाणे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होत आहे. यावेळी डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार ज्यो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आमनेसामने आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये चुरशीची लढत होईल, असं सांगण्यात येत आहे. पण, निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणांमध्ये अमेरिकी नागरिक बायडेन यांच्या बाजूने असल्याचे दिसत आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव झाल्यास आपण सहजासहजी पायउतार होणार नसल्याचे म्हटले होते.  

(edited by- kartik pujari)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar यांना पुण्यातील महिलेचा सल्ला, दादा बघा काय म्हणाले? | Pune News | Manohar Parrikar | Sakal News

मी शिवभक्त, विष पचवतो; आईच्या नावाने शिवीगाळ प्रकरणी PM मोदी पुन्हा बोलले

Mallikarjun Kharge: मणिपूर दौरा म्हणजे ढोंग व दिखावा; खचलेल्या लोकांचा अपमान केल्याचा खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर आरोप

Sharad Pawar : महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी जातीपातीचे राजकारण थांबवावे: शरद पवार

India-Pakistan Cricket Match : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून कोल्हापुरात ठाकरे आक्रमक, हॉटेलमध्ये सामना दाखवल्यास...

SCROLL FOR NEXT