Melania-trump 
ग्लोबल

‘फर्स्ट लेडी’ला जायचेयं फ्लोरिडाला;व्हाइट हाऊस सोडण्याची मनस्थिती 

पीटीआय

वॉशिंग्टन - अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे निवडणुकीतील पराभव अद्याप मानायला तयार नसताना त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प मात्र व्हाइट हाऊस सोडण्याच्या मनस्थितीत आहे. फ्लोरिडा येथील आपल्या घरी जाण्याचे त्यांना वेध लागले आहेत. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मात्र ज्यो बायडेन यांचा शपथविधी झाल्यानंतरच व्हाइट हाऊस सोडण्याचा विचार करत आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्यो बायडेन यांचा विजय झाला असला तरी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने विजयाचा दावा करत आहेत. ते कोणत्याही स्थितीत पराभव मान्य करत नसल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प मात्र आपल्या घरी जावू इच्छित आहेत. व्हाइट हाऊस सोडून फ्लोरिडा येथील घरी जाण्याची त्यांनी मनाची तयारी केली आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरच्या मध्यापासूनच मेलेनिया ट्रम्प या व्हाइट हाऊस सोडण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आग्रह करत आहेत. मात्र ट्रम्प यांनी पराभव मान्य केलेला नसल्याचे व्हाइट हाऊस सोडलेले नाही. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, मेलानिया यांनी व्हाइट हाऊस सोडण्याची तयारी सुरू केली असून त्या गुप्त रुपाने आपले सामान फ्लोरिडा येथे रवाना करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया यांचे चिरंजीव बेरॉन देखील फ्लोरिडा येथे राहण्यासाठी जाणार असून तेथे ते आपले शिक्षण पूर्ण करणार आहेत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुस्तक लिहण्याची तयारी 
मेलानिया ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस येथील आठवणींवर पुस्तक लिहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्या त्या व्हाइट हाऊसमधील आठवणी लिहण्यासाठी सहकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. पेज सिक्सने दिलेल्या वृत्तानुसार मेलानिया यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प देखील सहकार्य करत आहेत. ट्रम्प हे मेलानिया यांना लिहण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. अर्थात मेलानिया ट्रम्प यांचे हे पुस्तक भविष्यात बेस्ट सेलर ठरु शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. 

तिन्ही भूमिकांमध्ये मेलानिया समर्थ 
फर्स्ट लेडी स्टाफच्या प्रमुख स्टिफनी ग्रिशम म्हणाल्या, सध्या मेलानिया ट्रम्प यांनी फर्स्ट लेडीच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित केले आहे. टेनिस पॅव्हेलियन पूर्ण करण्याची घोषणा त्यांनी नुकतीच केली. तसेच रोझ गार्डनचे नुतनीकरण करण्यात आले असून त्याच्याही एका भागाचे अनावरण त्यांनी केले. ख्रिसमसनिमित्त सजावट करण्यातही त्या लक्ष देत आहेत. सध्याचे त्यांचे वेळापत्रक एक आई, पत्नी आणि अमेरिकेची पहिली महिला या नात्याने पूर्णपणे व्यग्र आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2027: गांगुलीने निवडली टीम इंडियाची Playing XI; रोहित-कोहलीसह ‘या’ खेळाडूंना संधी, पण एका स्टारला थेट केलं OUT

Latest Marathi News Live Update : धानावरील करपा, खोडकिडीच्या संकटावर आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

Kothrud Road,:कोथरूडमधील वृक्षतोडीला स्थगिती; पुनर्रोपणासाठी जागा उपलब्ध नाही

Manmad-Indore Railway;मनमाड-इंदूर रेल्वेसाठी ४,९३० कोटींची निविदा; महू-ग्यासपूरखेडी ७२.६६ किलोमीटर मार्ग; ४८ महिन्यांची कामासाठी मुदत

CJP Mumbai Protest: मुंबईत 'सीजेपी'चा एल्गार! मंत्रालयाबाहेर 'जेन नेक्स्ट' एकवटले; अभिजित दीपकेंचं मोठं विधान, म्हणाले...

SCROLL FOR NEXT