vaccine 
ग्लोबल

अमेरिकेत लशीचा मुहूर्त नोव्हेंबरचा;सुरक्षिततेबद्दल मात्र तज्ञांना चिंता

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन - कोरोनावरील लशीचे वितरण एक नोव्हेंबरपर्यंत होणार असून त्यासाठी सज्ज राहावे असा आदेश अमेरिकी सरकारने प्रांतांना दिला आहे. दरम्यान, लशीच्या सुरक्षिततेबद्दल आरोग्य तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

अमेरिकी रोग नियंत्रण आणि प्रतिबंध संस्थेचे संचाल रॉबर्ट रेडफिल्ड यांनी २७ ऑगस्ट रोजी गव्हर्नरना एक पत्र पाठविले आहे. संस्थेने लशीच्या वितरणासाठी मॅक्केसन कॉर्पोरेशनशी करार केला आहे. त्यानुसार त्यांचा परवाना अर्ज राज्यांना मिळेल. त्यावर त्वरेने कार्यवाही करावी. त्यानंतर प्रांतीय, स्थानिक आरोग्य खाते तसेच रुग्णालये येथे लशीचे वितरण होईल. तेथील सुविधा एक नोव्हेंबरपर्यंत सज्ज करण्यात येणारे संभाव्य अडथळे दूर करावेत. त्यासाठी एखादा नियम शिथिल करावा, पण त्यामुळे लशीच्या सुरक्षितता आणि परिणामकारकतेमध्ये कोणताही परिणाम होणार नाही.

सुरुवातीला लशीला अन्न आणि औषध प्रशासनाकडून मंजुरी मिळेल. अथवा आणीबाणीच्या अधिकाराखाली ही संस्था मान्यता देईल. लशीसाठी कोणत्या गटाला प्राधान्य द्यायचे हे आरोग्य अधिकाऱ्यांनी ठरवावे. लस देणारे अधिकारी निश्चित करावेत आणि  इतर कार्यवाही करावी असे या पत्रात नमूद करण्यात आले. लशीचे दोन डोस देण्यात येतील आणि त्यात एका महिन्याचे अंतर असेल. लस परिणामकारक ठरते आणि एक नोव्हेंबरपूर्वी ती सुरक्षित असेल का हे ठरविण्यासाठी पुरेशी आकडेवारी कशी मिळणार हा प्रश्न असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लस परिणामकारक आणि सुरक्षित आहे का हे तपासण्यापूर्वीच आणीबाणीच्या अधिकाराचा वापर करून अन्न-औषध प्रशासन लशीला मान्यता देणार का याची मला चिंता आहे. लसीकरणाचा विषय अशा पद्धतीने हाताळला जात आहे की ते पाहून सार्वजनिक आरोग्याची काळजी संबंधितांना वाटत असावी असे वाटत नाही. हा एक स्टंटच आहे.
-पीटर हॉटेझ, बेलॉर विद्यापीठाचे अधिष्ठाता

लस सुदृढ व्यक्तींना दिली जाते. अशावेळी संबंधितांवर सुरक्षिततेचा पुरावा सादर करण्याचे ओझे मोठे आहे. नोव्हेंबरचा प्रारंभ घाईचा वाटतो.
- आशिष झा,  ब्राऊन विद्यापीठाचे अधिष्ठाता

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

धोक्यापेक्षा फायदे...
अन्न-औषध प्रशासनाचे आयुक्त स्टीफन हान यांनी लशीच्या मुलव्यमापनाचे टप्पे कमी केले जाणार नाहीत असे यापूर्वीच स्पष्ट केले होते, मात्र धोक्यापेक्षा फायदे जास्त असल्यास चाचण्यांपूर्वी मान्यता देणे कदाचित योग्य ठरेल असे ते गेल्याच आठवड्यात म्हणाले होते.

निवडणूकीचा संदर्भ
तीन नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याआधी लस आणण्याचा ट्रम्प प्रशासनाचा प्रयत्न आहे. या निर्णयामागे राजकीय समीकरणांचा संदर्भ असल्याची चिंता आरोग्यतज्ञांनी व्यक्त केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT