ग्लोबल

'लोकशाही भारत-अमेरिका नात्याचा आधार'; USचे परराष्ट्र मंत्री भारतात

विनायक होगाडे

नवी दिल्ली : जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर पहिल्यांदाच अमेरिकेचे नवीन परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन भारत दौऱ्यावर आले आहेत. हा दौरा अनेक बाबतीत खास आहे. एंटनी ब्लिंकन यांनी आज परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली तसेच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना भेटले आहेत. त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतही भेट होणार आहे. दक्षिण आशियातील सद्यस्थितीचा विचार करता अमेरिकन परराष्ट्रमंत्री अॅंथनी जे. ब्लिंकेन यांचा दोन दिवसीय भारतदौरा अतिशय महत्त्वाचा ठरेल असं मानलं जातं आहे.

भारताच्या या दौऱ्याबाबत बोलताना अमेरिकेच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय की, ब्लिंकन कोरोनाच्या लढाईमध्ये एकत्र काम करणे, हिंदी-पॅसिफीक महासागर, पर्यावरण बदल तसेच इतर लोकशाही मुल्यांबाबतही चर्चा करतील. बुधवारी सकाळी ब्लिंकेन यांनी नवी दिल्लीतील नागरी समाजातील नेत्यांना संबोधित करून आपल्या भेटीची अधिकृत सुरुवात केली.

यावेळी एंटनी ब्लिंकन यांनी आपल्या ट्विटरवर ट्विट करत म्हटलंय की, आज नागरी समाजातील नेत्यांना भेटून मला आनंद झाला. अमेरिका आणि भारत लोकशाही मूल्यांबाबतीत प्रतिबद्ध आहेत; हा आमच्या दोघांच्याही संबंधांचा मुख्य भाग आहे आणि भारताच्या बहुलवादी समाज आणि एकोप्याच्या इतिहासाला प्रतिबिंबित करतो. नागरी समाज देखील या मूल्यांना उन्नत करण्यास मदत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोद या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेत क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेला हजेरी लावणार आहेत. त्या नियोजित भेटीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

ते म्हणालेत की, भारत आणि अमेरिका मित्र म्हणून आम्ही काही मुद्द्यांविषयी बोललो, आम्ही आपल्या लोकशाहीचे नूतनीकरण आणि बळकट करण्यात येणाऱ्या आव्हानांविषयी बोलतो. कितीही मोठी किंवा किती जूनी लोकशाही आहे हे लक्षात घेता, नम्रपणे आम्ही एकमेकांकडून शिकू शकतो. आमची मूल्ये अमेरिका आणि भारत संबंध मजबूत करतात. अमेरिकेप्रमाणेच भारताची लोकशाहीही स्वतंत्र विचारसरणीच्या नागरिकांनी चालविली आहे. आम्ही त्याचे कौतुक करतो. आम्ही भारतीय लोकशाहीकडे एक मुक्त इंडो-पॅसिफिक जगाच्या बचावासाठीची एक शक्ती म्हणून पाहतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT