Covid_19_Vaccine_0.jpg 
ग्लोबल

कोरोना लस सर्व नागरिकांना मोफतमध्ये मिळणार; अमेरिकीची घोषणा

सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- कोरोना लशीच्या किंमतीसंबंधात अमेरिकेने मोठी घोषणा केली आहे. कोरोनावरील प्रभावी आणि सुरक्षित लस तयार झाल्यानंतर ती सर्व अमेरिकी नागरिकांना मोफतमध्ये देण्यात येईल, असं अमेरिकेतील आरोग्य अधिकाऱ्याने सांगितलं आहे. शिवाय कोविड लशीची लशीकरण मोहीम पुढच्या वर्षापर्यंत हाती घेण्यात येणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. 

भारत युद्धाच्या उंबरठ्यावर?

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनावरील लस केव्हा येईल, यावर एका दिवसापूर्वी भाष केलं होतं.  कोविड लस एका महिन्याच्या अवधित उपलब्ध होणार असल्याचं ते म्हणाले होते. पेनेसेल्वेनियामध्ये प्रश्नोत्तराच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. कोरोना लस निर्मितीचे काम अत्यंत गतीने पुढे जात आहे. आपण लस मिळण्याच्या अगदी जवळ आहोत. काही आठवण्यात म्हणजे तीन किंवा चार आठवड्यात आपल्याला विषाणूवर प्रभावी ठरणारी लस मिळेल, असं ट्रम्प म्हणाले होते. कोरोना महामारी आपोआप नष्ट होईल, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

कोरोना लस केव्हा येईल, याबाबत ट्रम्प वेगवेगळे दावे करताना दिसत आहेत. कारण दोन दिवसांपूर्वी त्यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत लस चार ते आठ आठवड्यात येईल, असं म्हटलं होतं.  कोविड लस लवकरात लवकर तयार व्हावी, यासाठी डोनाल्ड ट्रम्प शास्त्रज्ञांवर दबाव आणत असल्याचा आरोप डेमोक्रॅटिकने केला आहे. अमेरिकेत 3 नोब्हेंबर रोजी अध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या आधी कोरोना लस आणण्यासाठी ट्रम्प प्रयत्न करत आहेत. 

अमेरिकेत कोरोना महामारीने अक्षरश: थैमान घातले आहे. अमेरिकेत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 66 लाखांच्या पुढे गेलीये. आतापर्यंत विषाणूचा बळी ठरलेल्या रुग्णांची संख्या 2 लाखांजवळ जाऊन ठेपली आहे. कोरोना बळींची संख्या वाढत आहे. त्यातच अमेरिकेत वर्णभेदी आंदोलन पेटलं आहे. शिवाय आर्थिक पातळीवरही अमेरिकेची पिछाडी होताना दिसत आहे. त्यातच अध्यक्षपदाच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्याने ट्रम्प यांनी कोरोना लस लवकर निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळेच ते वैज्ञानिकांवर लस निर्मितीसाठी दबाव आणत असल्याचं सांगितलं जातंय.

आंतराराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्या; भारतातही स्वस्त होऊ शकतं सोनं

दरम्यान, जगभरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3 करोडपर्यंत जाऊन पोहोचला आहे. जगभरात आतापर्यंत 9 लाख 93 हजार लोकांचा कोरोनाने बळी घेतलाय. अमेरिका कोरोनाने सर्वाधिक प्रभावीत देश ठरला आहे. त्यापाठोपाठ भारताचा क्रमांक असून ब्राझीलचा तिसरा क्रमांक आहे. सध्या जगभरातील 100 पेक्षा अधिक उमेदवार कोरोनावर प्रभावी लस निर्माण करण्याच्या कामात गुंतले असल्याचं जागतिक आरोग्य संघटेनेने सांगितलं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live Updates: बनावट नोकरीच्या जाहिरातींविषयी नागपूर मेट्रोचा इशारा

मृत डॉ. शिरीष वळसंगकरांच्या घरातील भांडण पोलिस ठाण्यात! रुग्णालयावरील घरात राहण्यावरून डॉक्टरांचे जावई अन्‌ सून डॉ. शोनाली यांच्यात वाद; सदर बझार पोलिसांत तक्रारी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २० जून २०२६ ते २६ जून २०२६ - मराठी राशी भविष्य

Aloo Cheese Thecha Paratha: साधा पराठा विसराल; एकदा खा हा आलू चीज ठेचा पराठा!

आजचे राशिभविष्य - 20 जून 2026

SCROLL FOR NEXT