trump with hicks 
ग्लोबल

डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना टेस्ट रिपोर्टची प्रतिक्षा; पत्नीसह स्वत: झाले क्वारंटाइन

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन - अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांची रंगत वाढत असतानाच आता ट्रम्प यांना क्वारंटाइन व्हावं लागलं आहे. त्यांची खासगी सल्लागार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची खासगी सल्लागार होप हिक्सला कोरोना झाल्याच समोर आलं. कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर हिक्सने टेस्ट केली होती. 

होप हिक्स अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत एअर फोर्स वनमधून नेहमीच प्रवास करते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या प्रेसिडेन्शियल डिबेटमध्येही होप हिक्स हिच्यासह इतर वरिष्ठ सहकारी उपस्थित होते. व्हाइट हाउसने म्हटलं की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प त्यांच्या आणि अमेरिकेची सेवा करणाऱ्या लोकांचे आरोग्य आणि सुरक्षेकडे गांभीर्याने पाहतात. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरून माहिती देताना म्हटलं की, होप हिक्स यांना कोरोना झाला आहे. हिक्स न थांबता मोठ्या कष्टाने काम करते. तिची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर माझी आणि मेलानियाची कोरोना टेस्ट केली असून रिपोर्टची प्रतिक्षा करत आहे. दरम्यान, आम्ही स्वत:ला क्वारंटाइन केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

ट्रम्प यांची खासगी सल्लागार असलेली होप हिक्स प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम केल्यानंतर यंदाच व्हाइट हाऊसमध्ये परतली होती. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची खासगी सल्लागार म्हणून तिची नियुक्ती करण्यात आली होती. याआधी तिने व्हाइट हाऊसमध्ये इतर जबाबदाऱ्याही पार पाडल्या आहेत. 2016 मध्ये ट्रम्प यांच्या मोहिमेची होप हिक्स प्रवक्ता होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB Win IPL 2026 Final: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 'जेतेपद' राखले! असा पराक्रम करणारा तिसरा संघ, विराट कोहलीची Fastest Fifty

विधान परिषदेसाठी भाजपची ११ उमेदवारांची यादी जाहीर; प्राजक्त तनपुरेंनाही संधी, राजकीय चर्चांना उधाण

Dhananjay Deshmukh: बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप 'फुसका बार'; सीसीटीव्हीने उघड केला दोन्ही बाजूंचा बनाव

Suman Kalyanpur: भारतीय संगीतविश्वातील सुवर्णपान हरपले! ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीतविश्व शोकमग्न

IPL 2026 Final, RCB vs GT live: गतविजेत्या बंगळुरूने इतिहास रचला! मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बनला पहिला संघ...

SCROLL FOR NEXT