Israel-Hamas War 
ग्लोबल

Israel-Hamas War: अमेरिकेकडून गाझासाठी मोठी आर्थिक मदत जाहीर; इस्राइल दौऱ्यादरम्यान बायडेन यांची घोषणा

कार्तिक पुजारी

तेल अवीव- इस्राइल दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी गाझा आणि वेस्ट बँकसाठी 100 मिनियल डॉलरची घोषणा केली आहे. जो बायडेन यांनी ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. संघर्षामुळे अनेक लोकांचा स्थलांतर व्हावे लागले आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोणातून ही मदत करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

जो बायडेन यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, 'मी आताच मानवतावादी मदतीसाठी १०० मिलियन डॉलरची (१० कोटी डॉलर) मदत गाझा आणि वेस्ट बँकसाठी जाहीर केली आहे. ही मदत १० लाख स्थलांतरित झालेल्या नागरिकांना आणि संघर्षग्रस्त पॅलेस्टिनी नागरिकांना मिळणार आहे. मदत गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचावी, ती हमास किंवा दहशतवाद्यांच्या हाती लागू नये यासाठी यंत्रणा उभी केली जाईल.'

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन इस्राइल दौऱ्यावर आहेत. त्यांनी इस्राइलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांना खंबीर पाठिंबा जाहीर केला आहे. आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन बायडेन यांनी त्यांना दिलं आहे. इस्राइलला आत्मसंरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे हमास विरुद्धच्या लढाईत अमेरिका त्यांच्या पाठिशी आहे. हेच जगाला सांगण्यासाठी मी इथे आलोय, असं बायडेन यावेळी म्हणाले.

गाझापट्टीतील एका हॉस्पिटलवर हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ५०० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. सदर घटनेमुळे सर्व स्तरांतून संतापाची लाट पाहायला मिळत आहे. इस्राइलने हा हल्ला आपण केला नसल्याचे जाहीर केले आहे. हमासच्या दहशतवाद्यांनीच हा हल्ला केला असल्याचा त्यांचा दावा आहे. नागरिकांवर हल्ले केले जाणार नाहीत, असं नेतान्याहू यांनी जाहीर केलं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT