biden 
ग्लोबल

US Presidential Election: निकाल हाती येण्यासाठी लागू शकतात आणखी काही दिवस

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन- अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. प्रत्यक्ष मतदान संपल्यानंतर मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या मतमोजणी कलानुसार, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यात अटीतटीची लढत सुरू असल्याचे समोर आले आहे. 

Live Updates:

-डोनाल्ड ट्रम्प यांनी सुप्रिम कोर्टात जाण्याची तयारी केल्यानंतर, बायडेन यांनीही आपली वकीलांची फौज तयार असल्याचे म्हटलं आहे. ट्रम्प मतमोजणी थांबवण्यासाठी सुप्रिम कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहेत. ट्रम्प मजमोजणी थांबवण्यासाठी कोर्टात गेले तर आमचीही कायदेशीर टिम तयार आहे, असं बायडेन यांच्याकडून सांगण्यात आले आहे. 
-काही ठिकाणी मतगणनेत घोटाळा झाल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. त्यामुळे काही राज्यातील मतमोजणी थांबवण्यात आली आहे. निकाल आता उद्या लागण्याची शक्यता आहे.

- ज्यो बायडेन यांनी 14 इलेक्टोरल वोट्सनी आघाडी घेतली आहे. बायडेन यांनी 227 इलेक्टोरोल वोट्स मिळवले आहेत, दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांना 213 इलेक्टोरोल वोट्स मिळाले आहेत.

अमेरिकी नागरिकांसोबत मोठी फसवणूक झाली आहे. खरं सांगायचं म्हटलं तर आपण निवडणूक जिंकली आहे. आपण आता सर्वोच्च न्यायालयात जावू. सुरु असलेली मतमोजणी थांबायला हवी, असं ट्रम्प म्हणाले आहेत.  

- सारा मॅकब्राइड पहिल्या ट्रान्सजेंडर सिनेट सदस्य
डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार सारा मॅकब्राइड यांनी डेलावेयर राज्यातून विजय मिळवला आहे. सिनेट पदाची शपथ घेतल्यानंतर त्या देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर स्टेट सिनेटर बनतील. मॅकब्राइड यांनी रिपब्लिक पक्षाचे उमेदवार जोसेफ मॅककोल यांचा पराभव केला. 

- डोनाल्ड ट्रम्प नेब्रास्का, लुईझिना येथे विजयी

- जो बायडन यांचा वॉशिंग्टन, ओरेगॉन, कॅलिफोर्निया आणि इलिनोइस येथे विजय

- बहुमताच्या दिशेने बायडन, आतापर्यंत 209 इलेक्टोरेल व्होट, तर 118 ठिकाणी ट्रम्प यांचा विजय

- फ्लोरिडामध्ये ट्रम्प यांना आघाडी

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत फ्लोरिडा राज्य खूप महत्त्वाचे आहे. सुरुवातीला फ्लोरिडामध्ये ट्रम्प आणि बायडन यांच्या काट्याची टक्कर दिसून आली होती. परंतु, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. वर्ष 2016 मध्ये ट्रम्प यांनी या राज्यात विजय मिळवला होता. 

- कमला हॅरिसच्या काकांनी केला बायडन यांच्या विजयाचा दावा

उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचे काका इन्सिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड ऍनालिसीसचे माजी संचालक जी बालचंद्रन यांनी जो बायडन विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. फ्लोरिडा राज्य महत्त्वाचे आहे. या राज्यात ट्रम्प यांचा पराभव झाला तर त्यांना राष्ट्राध्यक्षपद सोडावे लागेल. तिथे ट्रम्प यांना विजय मिळाला तरी बायडन यांना काहीच फरक पडणार नाही, असे ते म्हणाले. 

- रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार दक्षिण डाकोटा आणि उत्तर डाकोटा येथे डोनाल्ड ट्रम्प आणि कोलरॅडो आणि कनेक्टिक्ट येथे बायडन आघाडीवर

- ओहियो, नॉर्थ कॅरिलोना आणि पेन्सिलवेनियामध्ये जो बायडन यांच्याकडे आघाडी

-

-  US Democratic presidential nominee #JoeBiden wins Vermont: US media #USAElections2020 https://t.co/HYbHDJAT15

-जो बायडेन हे सध्या 220 इलेक्टेक्ट्रोल वोटसह आघाडीवर, राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांना 213 इलेक्टेक्ट्रोल वोट.

-डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन जनतेचे मानले आभार, रात्री लागणारा निकाल धक्कादायक असल्याचे दिले सुतोवाच.

- डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकांच्या निकालावर आक्षेप घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचेही सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT