रशिया व अमेरिका
रशिया व अमेरिका रशिया व अमेरिका
ग्लोबल

युक्रेनच्या मुद्द्यावरून रशिया व अमेरिकेत तणाव; दिला हा इशारा

सकाळ डिजिटल टीम

युक्रेनच्या (US) मुद्द्यावरून रशिया आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढत (Tensions between Russia and US) आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास युक्रेनमध्ये आपले सैन्य तैनात करेल, असे अमेरिकेने म्हटले आहे. सोबतच रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लादले जाऊ शकतात. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यातील चर्चेपूर्वीच अमेरिकेने रशियाला इशारा दिला आहे.

अमेरिका आणि युरोपीय देशांनी युक्रेनवर (Ukraine) हल्ला केल्यास रशियाची (Russia) सर्वांत मोठी बँक आणि इतर विदेशी चलनांवर निर्बंध घालण्याचा इशाराही दिला आहे. अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, पुतिन आणि बायडन भेटीत अमेरिका हे स्पष्ट करेल की युक्रेनला भविष्यात नाटोचे सदस्यत्व दिले जाऊ शकते. रशियाने युक्रेन सीमेवर एक लाखाहून अधिक सैनिक तैनात केले आहेत. युक्रेन आणि रशियामधील संबंध २०१५ पासून खराब झाले आहेत. रशियाने युक्रेन सरकारशी थेट संपर्क तोडला आहे.

रशियाने युक्रेनच्या सीमेवर १.७५ लाख सैन्य तैनात केले आहे. रशिया युक्रेनवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याचे अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रशियाने युद्धाला जाण्याचे नाकारले असले तरी अमेरिका आणि युरोपीय देशांनी युक्रेनला दिलेला पाठिंबा मागे घ्यावा, असे म्हटले आहे.

जानेवारीच्या उत्तरार्धात आक्रमण!

रशियाचे युक्रेन सीमेवर सुमारे ९४,००० सैनिक आहेत. गुप्तचर अहवालावरून असे दिसून येते की रशिया जानेवारीमध्ये युक्रेनवर हल्ला करू शकतो आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आणि सक्षम आहोत, असे युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह यांनी संसदेला सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar hoarding: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

PM Narendra Modi: पत्रकार परिषद का घेत नाही? पंतप्रधान मोदींनी स्पष्ट सांगितलं

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

SRH vs GT : हैदराबाद - गुजरात सामना पाण्यात! काही न करता पॅट कमिन्सचा संघ पोहचला प्ले ऑफमध्ये

SCROLL FOR NEXT