US Sinks Houthi Boats Sakal
ग्लोबल

लाल समुद्रातील हुथी बंडखोरांचा हल्ला अमेरिकेने हाणून पाडला; तीन जहाजं बुडवले, 10 जणांचा खात्मा

US Sinks Houthi Boats: लाल समुद्रामध्ये अमेरिकेने मोठी कारवाई केली आहे. अमेरिकेच्या सशस्त्र हेलिकॉप्टरने हुथी बंडखोरांच्या तीन जहाजांना समुद्रात बुडवलंय, तर १० हुथी बंडखोरांचा खात्मा केला आहे

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- लाल समुद्रामध्ये अमेरिकेने मोठी कारवाई केली आहे. अमेरिकेच्या सशस्त्र हेलिकॉप्टरने हुथी बंडखोरांच्या तीन जहाजांना समुद्रात बुडवलंय, तर १० हुथी बंडखोरांचा खात्मा केला आहे. हुथी बंडखोर एका व्यापारी जहाजावर हल्ला करण्यासाठी आले होते. रॉयटर्सने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (US Sinks Houthi Boats After Red Sea Attack 10 Rebels Killed accounts by American)

सिंगापूरचा झेंडा असलेल्या एका व्यापारी जहाजावर हल्ला करण्यासाठी हुथी बंडखोर आले होते. त्यावेळी अमेरिकेच्या लष्करी सैनिकांना याबाबत अलार्म देण्यात आला होता. त्यानंतर शीप सेक्युरिटी टीम आणि अमेरिकेच्या जवानांनी संयुक्त ऑपरेशन राबवून हुथी बंडखोरांचा हल्ला परतवून लावला. प्रतिहल्ल्यात हुथी बंडखोरांचे मोठे नुकसान झाले आहे.

हुथीच्या प्रवक्त्याने देखील जीवितहानीची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितलं की, '१० हुथी नौदल जवान मृत किंवा बेपत्ता आहेत. त्यांच्या जहाजांवर लाल समुद्रामध्ये अमेरिकेने हल्ला केला होता.' लाल समुद्रात हुथी बंडखोरांचे हल्ले वाढले आहेत. त्यादृष्टीने अमेरिका आणि इतर मित्र देशांनी लाल समुद्रातील सुरक्षा वाढवली आहे.

हुथी बंडखोरांना इराणचे समर्थन असल्याचं सांगितलं जातं. इस्राइल आणि हमासमध्ये संघर्ष सुरु झाल्यानंतर हुथी बंडखोर सक्रिय झाले आहेत. लाल समुद्रातून इस्राइलकडे जाणाऱ्या जहाजांवर हल्ला करण्यात येईल असं त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे लाल समुद्रात तणावाची स्थिती असून त्याचा परिणाम जागतिक व्यापारावर होत आहे.

युरोप आणि आशियाला जोडणाऱ्या सुएझ कालव्यातून जगातील जवळपास १२ टक्के व्यापार हा लाल समुद्रातून होता. इस्राइल-हमास युद्धानंतर हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातील आपली कारवाई वाढवली आहे. आतापर्यंत अनेक व्यापारी कार्गो जहाजांवर हुथींनी हल्ला केलाय. त्यामुळे अनेक बड्या कंपन्यांनी आपली जहाजे केप ऑप गूड होपला वळसा घालून आशिया किंवा युरोपमध्ये आणण्यास सुरुवात केलीये. त्यामुळे महागाई वाढू लागली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूरमध्ये हायव्होलटेज ड्रामा! अर्ज मागे घेऊ नये म्हणून भाजप उमेदवाराला लोकांनी घरातच कोंडलं

Akol crime: अकोल्यात रेल्वेखाली उडी घेऊन प्रेमीयुगलानं संपवलं जीवन; सरत्या वर्षाला निरोप अन् उचलले टोकाचे पाऊल!

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे गिरीश महाजन यांच्या भेटीला

India Squad For New Zealand ODIs : ऋतुराज गायकवाडचा पत्ता कट, मोहम्मद शमी पुन्हा दुर्लक्षित! भारताच्या वन डे संघात अचंबित करणारे निर्णय...

Daily Good Habits: मन फ्रेश अन् अ‍ॅक्टिव ठेवण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेला ‘हा’ कानमंत्र पाळा, तणाव होईल गायब

SCROLL FOR NEXT