काबूल  @saadmohseni/Twitter; @MalikMudassir2/Twitter
ग्लोबल

काबुल विमानतळावर अमेरिकन सैनिकांनी केला गोळीबार

अफगाणिस्तानात पुन्हा तालिबान राज येणार स्पष्ट झालं आहे. त्यामुळे देश सोडण्यासाठी काबुल विमानतळावर मोठी गर्दी उसळली आहे.

दीनानाथ परब

काबुल: अफगाणिस्तानात (Afganistan) पुन्हा तालिबान (Taliban) राज येणार स्पष्ट झालं आहे. त्यामुळे देश सोडण्यासाठी काबुल विमानतळावर मोठी गर्दी उसळली आहे. अफगाण नागरिकांसह विविध देशांचे नागरिक विमानतळावर पोहोचत आहेत. काल रविवारी संध्याकाळी अशीच गर्दी उसळलेली असताना, काबुल विमानतळावर गोळीबाराची घटना घडली.

आजही काबुल विमानतळावर गोळीबार झाला आहे. हा गोळीबार अमेरिकन सैनिकांनी केल्याचं स्पष्ट झालं आहे. काबुल विमानतळावर मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे हवेत गोळीबार केला. अमेरिकन सैन्याने रॉयटर्सला ही माहिती दिली आहे. लष्करी विमान पकडण्यासाठी पळणाऱ्या अफगाणि नागरिकांना रोखण्यासाठी हवेत गोळीबार करावा लागला. काबुल विमानतळावरील गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितलं

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घानी यांनी देश सोडल्यानंतर तालिबानी दहशतवादी काबुलमध्ये घुसले. त्यामुळे शहरात गोंधळाची स्थिती निर्माण झालीय. तालिबान राजवटीचा अनुभव असल्यामुळे नागरिकांच्या मनात भीती, दहशत आहे. अफगाणिस्तानात कशी गोंधळाची स्थिता आहे, त्याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. देश सोडण्यासाठी काबूल विमानतळावर गर्दी उसळली आहे. शेकडो लोक विमानतळावर दाखल होत आहेत.

काबूल विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाहनांची गर्दी आहे. मूळ अफगाणि नागरिकांनीही देशाबाहेर जाण्यासाठी गर्दी केलीय. रस्त्यावर तालिबानी दहशतवाद्यांना पाहून नागरिकांच्या मनात भीती निर्माण झालीय, असे काबूल पीस फोरमच्या शरीफ साफी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balochistan Blast : पाकिस्तानात पुन्हा पुलवामा सारखा आत्मघाती हल्ला; बलुचिस्तानमध्ये ५ सुरक्षा जवानांसह ८ जणांचा मृत्यू

'VFX कौतुक पुरे! अभिनय कधी करणार?' करण जोहरचा बॉलिवूड कलाकारांना टोला; 'रामायण'च्या चर्चेदरम्यान वक्तव्य व्हायरल

Gokak Waterfall Flowing : गोकाक धबधब्याला मिळाली नवसंजीवनी! हिडकल जलाशयातून पाणी सोडताच पुन्हा प्रवाहित झाला धबधबा, पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी साजरा केला बालदिन; केक वाटून मुलांच्या चेहऱ्यावर आणले हास्य

कोस्टल रोडच्या बोगद्यात मध्यरात्री अपघाताचा थरार! सहा वाहनांची भीषण धडक, अनेक गाड्यांचे नुकसान

SCROLL FOR NEXT