Afghanistan Bagram airfield  
ग्लोबल

अमेरिकी सैन्याची अफगाणिस्तानच्या बगराममधून 2 दशकानंतर घरवापसी

कार्तिक पुजारी

तब्बल दोन दशकानंतर अमेरिकी सैन्याला अफगाणिस्तानच्या बगराममधून परत बोलावण्यात आलं आहे. Associated Pressने अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

नवी दिल्ली- तब्बल दोन दशकानंतर अमेरिकी सैन्याला अफगाणिस्तानच्या बगराममधून परत बोलावण्यात आलं आहे. Associated Pressने अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने यासंदर्भातील माहिती दिली आहे. 9/11 च्या हल्ल्यानंतर अल कायदाच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये सैन्याला तैनात केले होते. अखेर अमेरिकी सैन्यांची वापसी होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी काही महिन्यांपूर्वी सैन्य वापसीची घोषणा केली होती. (US troops leave Afghanistan Bagram airfield after nearly two decades)

बगराम हवाईतळ अनेक मोठ्या संघर्षासाठी कुप्रसिद्ध आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हवाईतळ अफगाण लष्कराच्या ताब्यात देण्यात आले आहे. ज्यो बायडेन यांनी सप्टेबर महिन्यापर्यंत सर्व सैन्य परत बोलवणार असल्याची घोषणा केली होती. बगराम येथून सैन्य परत बोलावून त्यांनी या दिशेने पाऊल उचललं आहे. याठिकाणी अमेरिकेचे 2,500 ते 3,500 सैन्य होते. सध्या अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे 6500 सैन्य तैनात आहेत.

अमेरिकेच्या सैन्य वापसीला आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप महत्व आहे. तालिबान्यांसोबत छेडले गेलेले युद्ध आणि अल कायदांच्या दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात गेल्या 20 वर्षांपासून सैन्य तैनाती केली होती. अमेरिकेच्या या ऑपरेशनला म्हणावे तसे यश आले नाही. आर्थिक नुकसानीबरोबरच अमेरिकेला आपल्या अनेक सैन्यांचा जीव अफगाणिस्तानमध्ये गमवावा लागला. अमेरिकी नागरिकांमध्येही याबाबत असंतोष होता. माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्य वापसीची सुरुवात केली होती. त्यानंतर ज्यो बायडेन यांनी संपूर्ण सैन्य वापसी करणार असल्याचे जाहीर केले होते.

अमेरिकेच्या सैन्य वापसीनंतर अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचा बळ मिळणार आहे. त्यामुळे देशावर त्यांची पकड अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास अफगाणिस्तान पुन्हा अश्मयुगात जाण्याची भीती आहे. महिलांना जे आता थोडफार अधिकार मिळत होते, ते हिरावले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेच्या सैन्य वापसीचे अफगाणिस्तावर दुरगामी परिणाम होणार आहे. दरम्यान, अफगाण प्रकरणावर येत्या काळात भारताला महत्त्वाची भूमिका बजावावी लागू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: सूर्यकुमार - शुभमन गिलला सूर सापडला, पण पहिल्या T20I सामन्यावर पावसाचे पाणी, मॅच रद्द

Latest Marathi News Live Update : एडवोकेट गुणरत्न सदावर्ते पोलीस उपायुक्त परिमंडळ १ कार्यालयात दाखल

तिच्याशिवाय पर्याय नाही! दिग्दर्शकासोबत भांडली, तडकाफडकी मालिका सोडली; आता त्याच शोमध्ये परतणार अभिनेत्री

Mumbai Traffic: मुंबईकरांनो आनंदाची बातमी! जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड सुस्साट होणार, मार्गावरील मोठा अडथळा पालिकेने दूर केला

IND vs AUS 1st T20I: ओव्हर्स कमी होण्यामागे पाऊस नव्हे, तर भलतंच कारण! तुम्हाला कळलं तर म्हणाल, आमच्या इथे असं कधी होत नाही...

SCROLL FOR NEXT