US Two People Shot At A Gurudwara In Sacramento County California  
ग्लोबल

California: कॅलिफोर्नियामधील गुरुद्वारात फायरिंग; दोघांची प्रकृती गंभीर

कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो काउंटीमध्ये रविवारी रात्री उशिरा एका गुरुद्वारामध्ये बेछुट गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती

सकाळ डिजिटल टीम

अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो काउंटीमध्ये रविवारी रात्री उशिरा एका गुरुद्वारामध्ये बेछुट गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन लोकांमध्ये गोळीबार झाला, ज्यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले आहेत. काउंटी शेरीफच्या कार्यालयाने सांगितले की, गोळीबार दोन परिचितांमध्ये झाला. पोलिसांनी हा गुन्हा मानून तपास सुरू केला आहे.( US Two People Shot At A Gurudwara In Sacramento County California )

संपूर्ण घटना काय आहे?

या गोळीबाराचा द्वेषाच्या गुन्ह्याशी संबंध नाही. कारण गोळीबारात सहभागी असलेले तिघेजण एकमेकांच्या ओळखीचे होते. त्यांनी सांगितले की, यापूर्वी काही कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले होते.

त्यानंतर एका संशयिताने आपली बंदूक बाहेर काढली आणि भांडणात सहभागी असलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या मित्रावर गोळी झाडली. यानंतर गोळी न लागलेल्या व्यक्तीने बंदूक काढून पहिल्या व्यक्तीवर बेछुट गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.

नगर कीर्तनाच्या निमित्ताने ही घटना घडली रविवारी गुरुद्वारामध्ये नगर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो लोक गुरुद्वारामध्ये जमा झाले होते. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

SCROLL FOR NEXT