US warns Many MPs abducted by Russia eastern Ukraine Intrigue sakal
ग्लोबल

अमेरिकेचा इशारा : अनेक लोकप्रतिनिधींचे रशियाकडून अपहरण

पूर्व युक्रेनच्या विलीनीकरणाचा डाव

सकाळ वृत्तसेवा

किव्ह : युक्रेनच्या पूर्व भागाचा मोठा हिस्सा स्वत:मध्ये विलीन करून घेण्याचा रशियाचा इरादा असून या महिनाअखेरीपर्यंत ते आपली योजना अमलात आणू शकतात, असा इशारा अमेरिकेच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने आज दिला. पूर्व भागातील दोन्बास या प्रदेशाच्या ८० टक्के भागावर सध्या रशियाचे नियंत्रण आहे.

युरोपमधील सुरक्षा आणि सहकार्य संघटनेमधील अमेरिकेचे राजदूत मायकेल कारपेंटर यांनी पत्रकारांशी बोलताना रशियाबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. ते म्हणाले,‘‘युक्रेनच्या पूर्व भागात रशियन भाषिकांची संख्या अधिक आहे. या बहुतांशी भागावर सध्या रशियाचे नियंत्रण आहे. हा भाग रशियामध्ये विलीन करण्याचा डाव आहे. या कृतीला कायदेशीर मान्यता असल्याचे दाखविण्यासाठी येथे सार्वमतही घेण्याचा रशियाचा विचार आहे. या पूर्व भागातील शहरांच्या महापौरांचे आणि लोकप्रतिनिधींचे अपहरण झाले असून इंटरनेट सेवाही बंद आहे. लवकरच येथे रशियाचा कायदा लागू केला जाण्याची शक्यता आहे.

मारिउपोलमध्ये बाँबवर्षाव सुरुच

मारिउपोल शहरात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिल्यानंतरही रशियाचे रणगाडे या शहरात तोफगोळ्यांचा मारा करतच आहेत. यामुळे बचाव मोहिमेत अडथळे येत आहेत. या शहरातील नागरिकांना रशियाच्याच ताब्यातील गावांमध्ये हलविण्यात आले आहे. यातील काही जण युक्रेनच्या ताब्यातील गावांकडे रवाना झाले आहेत.

अमेरिकेचा अंदाज

मे अखेरीपर्यंत पूर्व युक्रेनचे विलीनीकरण करण्याचा डाव युक्रेनमधील खेरसन शहराला स्वतंत्र गणतंत्राचा दर्जा देण्याचा रशियाचा विचार

रशियाचे मोठे नुकसान

युक्रेनी सैनिनकांच्या चिवट प्रतिकारामुळे रशियाच्या सैन्याचे मोठे नुकसान झाले असून ते कमकुवत झाले आहे, असा दावा ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. रशियाची युद्धक्षमता घटत चालली असून त्यांच्यावर मोठा आघात केल्यास युद्धावर परिणाम होऊ शकतो, असे ब्रिटनने म्हटले आहे. रशियाने २००५ ते २०१८ या काळात संरक्षणावरील खर्चात मोठी वाढ केली असली तरी सैन्याचे आधुनिकीकरण करण्यात त्यांना अपयश आल्याचा दावाही करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Beed : कर्ज फेड नाहीतर पत्नीला माझ्या घरी सोड, सावकाराच्या जाचाने दुकानदाराची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं, वर्गणी काढून क्रियाकर्म करा

SCROLL FOR NEXT