USA_Visa 
ग्लोबल

महत्त्वाची बातमी! व्हिसाबाबत अमेरिकेने घेतलाय मोठा निर्णय

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अमेरिका, फ्रान्स, भारतासह अनेक देशांना याचा फटका बसला आहे. या कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका विद्यार्थी व्हिसावर अमेरिकेत गेलेल्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन होत आहे, अशा सर्व परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे. 

सध्या भारतासह इतर काही देशांतील विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत आहेत. पण लॉकडाऊनमुळे या सर्व गोष्टींना काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज पाहता अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाने ऑनलाईन शिक्षणास सुरुवात केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळत आहे, अशा विद्यार्थ्यांना अमेरिकेतून आपल्या मायदेशी जावे लागणार आहे.

जर संबंधित विद्यार्थ्यांनी असे केले नाही तर त्यांना अमेरिकेतून हद्दपार करण्यात येणार आहे, अशी घोषणाच इमिग्रेशन आणि सीमा शुल्क अंमलबजावणीकडून करण्यात आली आहे. तसेच या विद्यार्थ्यांना व्हिसावर अमेरिकेत प्रवेश दिला जाणार नाही, असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे. 

11 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांकडे व्हिसा

सध्या 11 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांकडे विद्यार्थी व्हिसा आहे. अमेरिकेतील परदेशी विद्यार्थ्यांमध्ये चीननंतर अनुक्रमे भारत, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया आणि कॅनडा येथील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, याबाबतची माहिती होमलँड सिक्युरिटी विभागाच्या आकडेवारीवरून देण्यात आली आहे. 

सर्व कोर्सेस ऑनलाईन करा

या निर्णयाची घोषणा करताना अमेरिकेतील प्रशासनाने सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांना सर्व कोर्सेस तातडीने ऑनलाईन माध्यमातून सुरु करावीत, असे आदेश जारी केले आहेत.

हजारो विद्यार्थी अमेरिकेत

भारतातील हजारो विद्यार्थी सध्या अमेरिकेत शिक्षण घेत आहेत. अमेरिका सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फटका या विद्यार्थ्यांनाही बसण्याची शक्यता आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT